Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Masters 2026: स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला मोठा धक्का; पहिल्याच फेरीत बाहेर, श्रीकांत किदाम्बीची दुसऱ्या फेरीत धडक

lakshya sen and kidambi srikanth In china Masters 2026: चायना मास्टर्स स्पर्धेत लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर, श्रीकांत किदाम्बीने दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 02, 2026 | 01:39 PM
lakshya sen and kidambi srikanth

lakshya sen and kidambi srikanth

Follow Us
Follow Us:
  • लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत
  • किदाम्बी श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक
  • भारताच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन चायना मास्टर्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लक्ष्य पहिल्यात फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाईकने लक्ष्यचा पराभव केला. २०२१ च्या जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता लक्ष्यने सामन्यात अनेक चुका केल्या. याचा फायदा जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टरने घेतला. लक्ष्यने हा सामना १४-२१, ७-२१ ने गमावला. दरम्यान, किदाम्बी श्रीकांतने आपला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेबाबत सस्पेन्स संपला! तमीम इक्बालने केला मोठा खुलासा, म्हणाले…

लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत बाहेर

लक्ष्य सेनचा चायना मास्टर्समधील प्रवास पहिल्याच फेरीत संपला. बुधवारी शेन्झेन एरिना येथे झालेल्या ३२ संघांच्या फेरीतील सामन्यात, कॅनडाच्या व्हिक्टर लाईने लक्ष्याला १४-२१, ७-२१ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा सामना केवळ ३८ मिनिटे चालला.

लक्ष्यने पहिल्या सेटची सुरुवात ४-० च्या आघाडीने केली. पण कॅनेडियन खेळाडूने लवकरच नियंत्रण मिळवले. व्हिक्टरने लक्ष्याला आघाडी मिळवण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि सतत दबाव कायम ठेवत पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही लक्ष्याला अडचणीतून बाहेर पडता आले नाही. व्हिक्टरच्या मजबूत डिफेन्सपुढे भारतीय खेळाडूचा संघर्ष सुरूच होता. दबाव वाढत गेल्याने लक्ष्याचा संयम सुटला आणि त्याने कॅनेडियन खेळाडूच्या बॅकहँड साईडलाईनवर वारंवार चुका केल्या. कोर्ट बदलल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झाला नाही. व्हिक्टरने आक्रमक शॉट्स मारत त्याला चुका करण्यास भाग पाडले. एका क्षणी लक्ष्या ४-११ ने मागे पडला आणि त्यानंतर त्याला पुनरागमन करता आले नाही. कॅनेडियन खेळाडूने सहजपणे हा सामना संपवला.

यावर्षी व्हिक्टर लाईने लक्ष्यला तिसऱ्यांदा पराभूत केले आहे. २०२६ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून आलेला व्हिक्टर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये चार सामने झाले असून, त्यात लाई ३-१ ने आघाडीवर आहे. लाईने यावर्षी थॉमस कपमध्ये आणि जुलैमध्ये झालेल्या चायना ओपनच्या १६ संघांच्या फेरीतही लक्ष्याला पराभूत केले होते.

श्रीकांत किदाम्बीची दुसऱ्या फेरीत धडक

भारताने दिवसाची चांगली सुरुवात केली. २०२१ च्या विश्वचॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांतने ची यु-जेनला २१-१६, २१-१५ असे हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. युवा रौनक चौहानने चीनच्या लिऊ यु जुआनला २१-१५, २१-१८ असे हरवले, तर सनिथ दयानंदने चीनच्या तिसऱ्या मानांकित डोंग तियान याओला ९-२१, २१-१८, २१-१५ असे हरवून एक मोठा उलटफेर घडवला. मात्र, किरण जॉर्ज जपानच्या शोगो ओगावाकडून १५-२१, २३-२१, १०-२१ ने पराभूत झाली. महिला एकेरीमध्ये, अनमोल खराबने हाँगकाँगच्या लियांग का विंगला २१-१७, २१-९ असे हरवले . तर, अश्मिता चालिहाने थायलंडच्या पोर्नपिचाला २१-१७, २३-२१ असे हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीमध्ये, ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने थाई जोडीचा २१-८, २१-९ असा सहज पराभव केला.

इतर भारतीय खेळाडूंमध्ये पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसेच महिला एकेरीतील खेळाडू तन्वी शर्मा आणि देविका सिहाग हे आज आपले सामने खेळतील.

कोर्टवर उलट्या, शरीर थकलं पण शेवटपर्यंत लढला! Navone ने Djokovic ला US Open मधून बाहेर काढलं; २४ ग्रँडस्लॅमचा चॅम्पियन ढसाढसा रडला

Web Title: China masters 2026 lakshya sen out kidambi srikanth second round

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Badminton
  • China
  • lakshya sen

संबंधित बातम्या

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?
1

China Gold: जागतिक अर्थकारणात मोठी उलथापालथ! चीनने जमवला 2,410 टन सोन्याचा साठा, अमेरिकन डॉलरची चिंता का वाढली?

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
2

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
3

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
4

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.