Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: गोलंदाजांच्या धुलाईनंतर ‘बेबी बॉस’वर फिदा झाला ‘युनिव्हर्सल बॉस’; वैभव सूर्यवंशीसाठी ख्रिस गेलची खास पोस्ट

Chris Gayle Instagram Post For Vaibhav: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर ख्रिस गेलचाही विक्रम मोडला, यानंतर, गेलने वैभवसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 04:23 PM
Vaibhav Sooryavanshi: गोलंदाजांच्या धुलाईनंतर ‘बेबी बॉस’वर फिदा झाला ‘युनिव्हर्सल बॉस’; वैभव सूर्यवंशीसाठी ख्रिस गेलची खास पोस्ट
Follow Us
Follow Us:
  • ‘बेबी बॉस’वर फिदा ‘युनिव्हर्सल बॉस
  • सूर्यवंशीसाठी ख्रिस गेलची खास पोस्ट
  • सूर्यवंशीचे ६ ऐतिहासिक विक्रम
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी करत इतिहास रचला. अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची स्फोटक खेळी करत वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार ठोकत टी-२० क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वैभवला शतकासाठी फक्त तीन धावांची गरज होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर झेलबाद झाला आणि त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. तरीही त्याच्या २९ चेंडूंतील ९७ धावांच्या तुफानी खेळीने क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. या कामगिरीसह वैभवने टी-२० क्रिकेटचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकारांचा १४ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. आता या हंगामात वैभवच्या नावावर तब्बल ६५ षटकारांची नोंद झाली आहे.

GT vs RR : फायनलच्या तिकिटासाठी ‘गुजरात-राजस्थानमध्ये’ रंगणार महामुकाबला; कधी अन् कुठे होणार सामना? जाणून घ्या

ख्रिस गेलही झाला वैभवचा फॅन

वैभवच्या या विस्फोटक खेळीने प्रभावित होत ख्रिस गेलने स्वतः सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले. सामन्यानंतर गेलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर स्क्रीनवरील वैभवचे फोटो शेअर करत त्याला “नवीन सिक्स मशीन” अशी खास उपाधी दिली. गेलने सोशल मीडियावर वैभवच्या फलंदाजीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, “कार्नेज वैभव सूर्यवंशी… दुर्दैवी! पण तू सुद्धा तिथे पोहोचशील.” क्रिकेटमध्ये ‘कार्नेज’ हा शब्द अशा फलंदाजासाठी वापरला जातो जो गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करतो. सर्वात जलद शतकाचा विक्रम थोडक्यात हुकल्यामुळे गेलने त्याला दुर्दैवी म्हटले, पण भविष्यात तो हा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वासही व्यक्त केला.

APPROVAL FROM UNIVERSE BOSS 😍 – Chris Gayle’s Instagram stories for Boss Baby, Vaibhav Suryavanshi. pic.twitter.com/Qops6I1QnV — Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2026
What a phenomenal player Vaibhav is. Great entertainment young man! New Six machine @IPL pic.twitter.com/ofElAousF7 — Chris Gayle (@henrygayle) May 27, 2026

क्रिकेटमध्ये ‘कार्नेज’ हा शब्द अशा फलंदाजासाठी वापरला जातो जो गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करतो. सर्वात जलद शतकाचा विक्रम थोडक्यात हुकल्यामुळे गेलने त्याला दुर्दैवी म्हटले, पण भविष्यात तो हा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वासही व्यक्त केला. यानंतर ख्रिस गेलने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टोरी शेअर करत वैभवचे कौतुक केले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अप्रतिम वैभव सूर्यवंशी, आयपीएलचा नवा सिक्स मशीन.” टी२० क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशाह मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने एका भारतीय तरुण फलंदाजाला “नवीन सिक्स मशीन” म्हणणे, ही वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेची मोठी पावती मानली जात आहे.

वैभव सूर्यवंशीचे या हंगामातील ६ ऐतिहासिक विक्रम

  • एका हंगामात अनकॅप्ड खेळाडूकडून सर्वाधिक धावा – ६८० धावा
  • आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार – ६५ षटकार
  • आयपीएल इतिहासात २००+ स्ट्राईक रेटने ६०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज
  • आयपीएल प्लेऑफ/नॉकआऊट सामन्यात सर्वाधिक षटकार – १२ षटकार
  • सर्वात कमी चेंडूंमध्ये १० षटकार मारण्याचा विक्रम – फक्त २४ चेंडू
  • आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार – ८ षटकार

राजस्थानला फायनलकडे नेणारा ‘बेबी बॉस’

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात वैभव सूर्यवंशीची खेळी निर्णायक ठरली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानने अंतिम फेरीकडे दमदार पाऊल टाकले आहे.

ऑरेंज कॅपवर वैभवचा कब्जा

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ डावांत तब्बल ६८० धावा केल्या असून तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. आता फायनलमध्ये पोहचण्यासाठी राजस्थान रॉयल्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. हे दोन्ही संघ शुक्रवारी क्वालिफायर २ मध्ये आमनेसामने भिडणार आहेत.

Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, ‘मला रेकॉर्ड्स नकोत, पण… १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

Web Title: Chris gayle instagram post new sixer machine for vaibhav sooryavanshi cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Chris Gayle
  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

अपना भाई, नुसती तबाही! Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; ‘युनिव्हर्स बॉस’चा मोडला रेकॉर्ड
1

अपना भाई, नुसती तबाही! Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; ‘युनिव्हर्स बॉस’चा मोडला रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.