Marcus Stoinis is engaged to partner Sarah Zarnuch : काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस सध्या चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा एक भरवशाचा स्फोटक फलंदाज असणारा मार्कस स्टॉइनिस आता आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत आहे. हा ऑस्ट्रेलीयन अष्टपैलू खेळाडू प्रेमात बुडाला आहे. मार्कस स्टॉइनिस प्रेमात पडला असून तो जोडीदार सारा झारनुचसोबत लग्न करणार आहे. याबाबत त्याने इंस्टाग्राम त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस सर्वांना परिचित आहे. त्याने एकदिवसीय सामने असो वा टी २०, या दोन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या संघाला केवळ बॅटनेच नाही तर गोलंदाजीने अनेक वेळा सामने जिंकून दिले आहेत. तो आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो भरतातीय प्रसिद्ध लीग आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे.
स्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने आपल्या इंस्टाग्राम त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची जोडीदार सारा झारनुची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये या दोघांचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. सारा झारनुच त्यामध्ये लिहिले आहे की, ” स्पेनच्या किनाऱ्यावरील एका बोटीवर, मी माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा हो म्हटले ०३.०९.२५” अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.या फोटोमध्ये हे दोघे एका बोटमध्ये आहेत. यामध्ये सारा आपल्या हाताच्या बोटात घातलेली अंगठी देखील दाखवत असल्याचे दिसत आहे.
मार्कस स्टोइनिसने २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. त्याने ७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९५ धावा केल्या असून ज्यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८-१९ मध्ये त्याला देशाचा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले होते. तो टी-२० (२०२१) आणि एकदिवसीय (२०२३) दोन्ही स्वरूपात ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग देखील राहिला आहे.
पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू महम्मद नवाजने या सामन्यात इंटईहासिक कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन गडी माघारी पाठवले. त्यानंतर, मोहम्मद नवाजने सामन्याचा आठवा षटक टाकला आणि या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने इब्राहिम झद्रानची विकेट घेऊन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. यासह, नवाज पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला असा पराक्रम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करता आलेली नाही.