
लय खतरनाक नियोजन! इंग्लंड 'या' ठिकाणी Vaibhav Suryvanshi ला घेरणार; वाचा सविस्तर...
गेल्या दोन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार सिक्स मारत खेळीची सुरुवात केली. मात्र त्याला मोठ्या खेळीत त्याचे रूपांतर करण्यात आले नाही. त्याला इंग्लंड दौऱ्यात संघर्ष करावा लागत आहे. त्यातच आता वैभवची कमकुवत बाजू आम्ही शोधून काढली आहे असे आदिल राशीदने म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात वैभवच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आयर्लंड दुआर्यट वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यात त्याने दुसऱ्या सामन्यात इंटरनॅशनल डेब्यू केले. मात्र त्याला गेल्या दोन सामन्यांमध्ये साजेशी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्याने दोन्ही सामन्यांत प्रत्येकी दोन सिक्स मारत चांगली सुरुवात केली होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध आखलेल्या रणनीतीमुळे तो आउट जलयाचे दिसून आले.
अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…
दोन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला आपल्या शैलीत मोठी धावसंख्या न करता आल्याने आजच्या सामन्यात त्याच्यावर काहिसे दडपण असण्याची शक्यता आहे. त्यातच आता इंग्लंडचे खेळाडू त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान आदिल राशीदने वैभव सूर्यवंशी शॉर्ट बॉलवर अडखळत असल्याचे म्हटले. इंग्लंडच्या संघाने त्याच्याविरुद्ध पूर्ण रणनीती तयार केली असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आज वैभव या रणनीतीला कसे उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत
श्रेयस अय्यरकडे टी 20 संघाचे कर्णधारपद बीसीसीआयने सोपवले आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडकडून देखील भारताचा पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने सलग 5 सामने गमावले आहेत. आता इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-० ने मागे पडला आहे.
IND vs ENG: …तर आज Axar Patel धोनीलाही मागे टाकणार! पाहा काय आहे ‘तो’ महाविक्रम
इंग्लंडविरुद्ध भारताचा तिसऱ्या सामन्यात 125 रन्सने दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सामन्यात अवघ्या २०२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या ७६ धावांवर गारद झाला. आता याचा परिणाम आयसीसी टी-२० रँकिंगवर होताना दिसून येत आहे. रेटिंग पॉईंट्स कमी झाल्याने भारतीय संघाचे पहिले स्थान हातातून जाण्याची शक्यता आहे. भारताचा आज पराभव झाल्यास आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठे नुकसान होऊ शकते.