रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 68 व्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रंगली होती. परंतु चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांचे चाहते हे त्यांच्या खेळाडूंसाठी आणि त्यांच्या संघांसाठी फारच वेडे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करून चाहत्यांचा दिवस गाजवला. तर चेन्नई सुपर किंग्सच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर आरसीबीने 8 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला आणि चाहत्यांमध्ये उत्साह दिसून आला.
[read_also content=”चेन्नईच्या पराभवानंतर माहीचा क्रिकेट प्रवास संपला? धोनीचा शेवटचा IPL सामना… https://www.navarashtra.com/sports/mahis-cricket-journey-over-after-chennai-defeat-ms-dhonis-last-ipl-match-535144.html”]
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांचा उत्साह गगनात
आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांत केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग सहा सामने जिंकून टॉप-4 मध्ये स्थान मिळवले.
आरसीबीच्या विजयानंतर, फ्रँचायझीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, जो पटकन व्हायरल झाला. आरसीबीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की चाहते स्टेडियमपासून हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर उभे आहेत आणि आपल्या स्टार्सची एक झलक मिळण्याच्या आशेने दोन्ही हात हलवत आहेत. आरसीबीचा विजय पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
व्हिडिओ शेअर करताना आरसीबीने कॅप्शन लिहिले की, रात्री दीड वाजताचे हे दृश्य आहे. हे गोष्टी अधिक खास बनवते. आमचे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
This was at 1:30 am tonight… This is what makes it all the more special. ❤ We have the best fans in the world and we’re so proud of it. ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvCSK pic.twitter.com/tVnVRoxQ8O
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 18, 2024
कालच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर बंगळुरूच्या चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळाला. रात्री उशिरा, बेंगळुरूचे चाहते रस्त्यावर उतरले आणि विजय साजरा केला. चाहते बस आणि कारच्या छतावर चढले आणि भरपूर नाचले.
चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामना
आरसीबीने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 218/5 धावा केल्या. प्रत्युत्तरात CSK संघाला 20 षटकात 191/7 धावा करता आल्या. 18 मे रोजी आयपीएलमध्ये आरसीबीने सीएसकेचा पराभव करण्याची ही तिसरी वेळ होती. 18 मे हा दिवस आरसीबीसाठी खास आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 18 मे रोजी आरसीबीने कधीही हरली नाही.