RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार (Photo Credit - X)
🚨 RCB IN CHINNASWAMY IS LOCKED & LOADED 🚨 – Karnataka Cabinet has approved to host the IPL matches in Chinnaswamy stadium. Government has asked KSCA to allow around 30k to 35k fans. pic.twitter.com/NHzVE5hxkx — Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2026
बीसीसीआयने अद्याप २०२६ च्या आयपीएल हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमच्या उपलब्धतेबाबत साशंकता असल्याने आरसीबी फ्रँचायझीने पर्यायी मैदानांची चाचपणी सुरू केली होती. यामध्ये नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी आणि रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा समावेश होता. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याची परवानगी मिळाल्याने आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) नवे अध्यक्ष आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी पदभार स्वीकारल्यापासून बंगळुरूमध्ये क्रिकेटचे पुनरागमन व्हावे यासाठी मोठे प्रयत्न केले. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा चिन्नास्वामीवर आणण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे यश मिळाले.
कर्नाटक सरकारने ही परवानगी देताना काही महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. मंत्रिमंडळाने ‘कुन्हा अहवालात’ नमूद केलेल्या शिफारसींचा स्वीकार केला आहे. यानुसार, स्टेडियममध्ये एका वेळी जास्तीत जास्त ३५,००० प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे फ्रँचायझी आणि आयोजकांसाठी बंधनकारक असेल. मंत्री रामलिंग रेड्डी यांनी स्पष्ट केले की, अहवालात नमूद केलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्यावरच सामन्यांचे आयोजन सुलभ होईल.
आता कर्नाटक सरकारची परवानगी मिळाल्याने बीसीसीआय पुढील काही दिवसांत आयपीएल २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. गतविजेते असल्यामुळे आरसीबीचे पारडे आधीच जड आहे, त्यात आता घरच्या मैदानाचे आणि ‘चिन्नास्वामी’च्या आक्रमक चाहत्यांचे पाठबळ मिळाल्यामुळे संघाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.






