CSK vs RCB: RCB deprived of a win at Chepauk for 17 years; Will the drought end in today's match? Read in detail..
CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 7 सामने खेळवले गेले असून आज शुक्रवार (दि. 28 मार्च) 8 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रंगणार आहे. हा रोमांचक सामना चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी 18 व्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. अशातच एक आकडेवारी समोर आली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आरसीबीचे रेकॉर्ड फार चांगले राहिले नाही. आरसीबीला या मैदानावर गेल्या 17 वर्षांपासून एकही सामना जिंकता आलेला नाही.
विराट कोहलीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा चाहता वर्ग लाभला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर इतर सर्व आयपीएल संघांपेक्षा अधिक शक्तिशाली दिसून येत आहे. परंतु, आजवर या संघाला आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरता आलेले नाही. मात्र, आयपीएल 2025 ची सुरवात आरसीबीने विजयाने केली आहे. मात्र आता चेन्नई विरुद्ध खरी पाहायला मिळणार आहे. वास्तविक पाहता आरसीबी आपला दुसरा सामना अशा संघाच्या घरच्या मैदनावर खेळणार आहे. ज्या मैदानावर आरसीबीला गेल्या 17 वर्षांपासून पराभव पत्करावा लागत आहे.
हेही वाचा : Shardul Thakur : ‘झहीर खानचा एक कॉल अन् मी..’; आयपीएलमधील संघर्षमय एंट्रीबाबत शार्दुल ठाकूर झाला व्यक्त..
आयपीएल 2025 चा 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात येणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहेत. या मैदानावर आरसीबीचा रेकॉर्ड खूपच वाईट राहिला आहे. आरसीबीने चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा पराभव हा 2008 साली केला होता, जो आयपीएलचा पहिला हंगाम होता. यानंतर प्रत्येक वेळी आरसीबीला चेन्नई सुपर किंग्जने आपल्या घरच्या मैदानावर पराभूत केले आहे.
चेपॉक मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत 9 सामने पार पडेल आहेत. या दरम्यान आरसीबीने फक्त 1 सामनाच आपल्या नावे केले आहे. तर 8 सामने चेन्नई सुपर किंग्जने जिंकले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्जने 21 सामन्यांमध्ये आरसीबीला धूळ चारली आहे. तर आरसीबीला केवळ 11 सामन्यांतच विजय मिळवता आला आहे. याशिवाय 1 सामना अनिर्णित देखील राहिला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : रोहित शर्मा ‘सिक्सर किंग?’ छे, छे…! आता ते विसरा: ‘किंग कोहली’ विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर…
आतापर्यंत आयपीएलमधील दोन्ही संघांदरम्यान खेळवण्यात आलेल्या शेवटच्या 5 सामन्यांबद्दल सांगायचे झाले तर, येथेही सीएसके हा संघच वरचढ दिसून येतो. चेन्नई सुपर किंग्जने या कालावधीत 3 सामने आपल्या नावे केले आहेत. त्याचवेळी आरसीबीने 2 सामन्यात बाजी मारली आहे. मात्र, दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या नावे केला होता.