रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा मोसम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. सध्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे टी-२० साठी भारतीय संघातून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एका विक्रमाची. आयपीएलच्या या महाकुंभात या दोघांनी डुबकी घेतलीय आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेटसह संपूर्ण जगात लोकप्रिय फलंदाज आहेत. त्यांच्या खेळबाबत सर्वत्र कौतुक होताना दिसत असते.
या दोन्ही खेळाडूंची फॅन फॉलोइंग देखील मोठ्या प्रमाणात आहे. रोहित शर्मा हा त्याच्या लांब षटकारांसाठी ओळखला जातो. तर विराट कोहली हा त्याच्या शैलीतील चौकरांसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो. क्रिकेट जगतात देखील रोहित शर्माला सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये गणले जाते. तर दुसरीकडे विराट हा चौकारांसह मॅच फिनिशर म्हणून देखील नावाजला जातो.
या दोघांमध्ये क्रिकेट खेळताना बऱ्याच घटकांवरून स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते. कधी कोहली एखादा विक्रम करतो यानी काही महिन्यांनी रोहित तो विक्रम आपल्या नावे करतो. तसेच या उलट देखील चित्र आपल्याला पहायाला मिळते. परंतु आता अशाच एका विक्रमाबाबत रोहित आणि कोहली यांच्यात स्पर्धा रंगली आहे. केवळ रोहितच नाही तर विराटनेही त्याच्याइतके षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये रोहित आणि विराटने मारलेल्या षटकारांबद्दल आपण जाणून घेऊया.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर नोंदवाला गेला आहे. गेलने 142 सामन्यात 357 षटकार लगावले आहेत. गेलनंतर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने 280 षटकार मारले आहेत. रोहितनंतर विराट कोहली याचा नंबर येतो. विराटने २७२ षटकार लगावले आहे. तर एम.एस. धोनी 252 षटकार लगावत चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मारलेल्या षटकारांमधील फरक बघितला तर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. विराट आता रोहितच्या या विक्रमाच्या खूप जवळ आला आहे. आता अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित आणि कोहली यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगलेली दिसणार आहे.
हेही वाचा : CSK vs RCB : आज चेपॉकवर सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार घमासान: दोन्ही संघाबाबत जाणून घ्या A टू Z माहिती..
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामाना करायला लावला आहे. तर दुसरीकडे, मुंबईने आयपीएल 2025 मध्ये दरवर्षीप्रमाणे सामना गमावून आयपीएलची सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने एमआयला पहिल्या सामन्यात धूल चारली आहे.