
'मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने'चा विस्तार
दिल्ली सरकारने क्रीडा क्षेत्राला आणि तळागाळातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील युवा खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षणाचा खर्च भागवता यावा यासाठी दरमहा ₹२,००० ची थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली.
‘मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने’अंतर्गत ‘ग्रासरूट ट्रेनिंग सपोर्ट असिस्टन्स’ माध्यमातून दिला जाणार आहे. दिल्ली सरकारच्या अधिकृत स्पोर्ट्स सेंटर्स आणि स्टेडीअममध्ये नियमितपणे क्रीडा प्रशिक्षण घेणारे युवा खेळाडू योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेमुळे दिल्लीतील हजारो क्रीडापटूंना मोठा दिलासा मिळणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुण पिढीला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.
दिल्ली सरकारने तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला बळ देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने’चे नियम स्पष्ट केले आहेत. दिल्ली सरकारच्या प्रत्येक अधिकृत स्पोर्ट्स सेंटर किंवा स्टेडियममध्ये नियमित नोंदणीकृत असलेल्या एकूण खेळाडूंपैकी जास्तीत जास्त २५ टक्के खेळाडूंना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाईल.
या योजनेचा लाभ खालील चार प्रमुख वयोगटांतील खेळाडूंना मिळणार आहे.
खेळाडूंना हे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा ठरणार नाही, तर त्यांची पारदर्शक निवड केली जाईल. यासाठी खेळाडूची मैदानी कामगिरी, खेळातील क्षमता, सरावातील नियमित उपस्थिती, शिस्त आणि कुटुंबाची आर्थिक गरज हे महत्त्वाचे निकष गृहीत धरले जाणार आहेत. सामान्यतः एका स्पोर्ट्स सेंटर किंवा स्टेडियममधून जास्तीत जास्त १०० खेळाडूंची या मदतीसाठी निवड केली जाणार आहे.