फोटो सौजन्य – X (Delhi Premier League T20)
दिल्ली प्रीमियर लीग 2025 चा सध्या हंगाम सुरू आहे. या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. दिल्ली प्रीमियर लीग २०२५ च्या ११ व्या सामन्यात गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सेंट्रल दिल्ली किंग्जने साउथ दिल्ली सुपरस्टार्सना एकतर्फी सामन्यात हरवून डीपीएल २०२५ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, सेंट्रल दिल्ली संघ डीपीएल २०२५ पॉइंट टेबलमध्ये ६ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
सेंट्रल दिल्ली किंग्जने विरुद्ध साउथ दिल्ली सुपरस्टार्स याच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्जविरुद्ध ९ विकेट्सने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर, सेंट्रल दिल्ली किंग्जला नेट रन रेटमध्येही जबरदस्त फायदा झाला आहे. हंगामातील सलग तिसऱ्या विजयानंतर, सीडीकेचा नेट रन रेट +४.२२१ आहे, जो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांमध्ये सर्वाधिक आहे. दिल्ली प्रीमियर लीग 2025 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर पहिल्या स्थानावर सेंट्रल दिल्ली किंग्सचा संघ आहे. या संघाचा आत्तापर्यंत तीन सामने झाले आहेत या तीनही सामन्यात विजय मिळवून हा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे.
या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर वेस्टन दिल्ली लायन्सचा संघ आहे. वेस्टन दिल्ली लाईनच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी दोन सामन्यात विजय मिळवला आहेत तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. डीपीएल 2025 चा पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर ईस्ट दिल्ली रायडर्सचा संघ आहे. ईस्ट दिल्ली रायडरच्या संघाने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आऊटर दिल्ली वॉरियर्सचा संघ आहे. आऊटर दिल्ली वॉरियर्सचा तीन सामन्यांपैकी एक सामन्यात विजय मिळवला आहे तर पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्थ दिल्ली स्ट्राइकरच्या संघाचे आत्तापर्यंत दोन सामने झाले आहेत त्यामध्ये त्यांना एक सामनात विजय मिळाला आहे तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Central Delhi Kings are leading the points table with three consecutive wins after the 11th match of the Adani Delhi Premier League 2025. ✨
Central Delhi Kings | Adani Delhi Premier League 2025 | DPL #AdaniDPL2025 #DPL2025 #PointsTable pic.twitter.com/c8YwbFculO
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 8, 2025
न्यू दिल्ली टायगरच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना एक समस विजय मिळाला आहे तर दोन सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर साउथ दिल्ली सुपरस्टारचा संघ आहे या संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. सातव्या स्थानावर गुणतालिकेमध्ये पुराने दिल्ली ६ चा संघ आहे या संघाने दोन सामने खेळल्या आहेत यामधील त्यांना एक सामन्यात विजय मिळाला आहे तर एक सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.