डीएसपी करंडक (फोटो- सोशल मिडिया)
डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे पुण्यात आयोजन
चंद्रोस, मिडास क्रिकेट अकादमी संघांची आगेकूच
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू आहे स्पर्धा
पुणे/Cricket: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमी, मिडास क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत तरण अय्यंगर (२३ धावा व ३-६) यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट (pune) अकादमी संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा १११ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आर्यन कुमार (२० धावा व १-३) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिडास क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा १९ धावांनी पराभव केला.
चंद्रोस क्रिकेट अकादमी: २५ षटकात ९ बाद १६३ धावा (महेश नवले २४, तरण अय्यंगर २३, शिशिर विश्वकर्मा २१, ऋतिक यादव १३, चिन्मय पाष्टे २-३४, सोहम सोळसकर १-१९) वि.वि. सार्क क्रिकेट अकादमी: १६.४ षटकात सर्व बाद ५२ धावा (सोहम सोळसकर २२, संकल्प कोरचगाव ११, तरण अय्यंगर ३-६, अर्णव सोनार २-५); सामनावीर – तरण अय्यंगर.
DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
२५ षटकात सर्वबाद १२६ धावा (सोनहर्ष दिघे ४० (५०, ४×४), आर्यन कुमार २०, हर्षल काकडे २-१२, अव्यान सिंग १-५) वि.वि. पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी: २४ षटकात सर्वबाद १०७ धावा (शौर्य सिंग २७, शरण्या धुमाळ १२, अथर्व पवार १०, विनायक चोबे २-१२, सुमित क्षीरसागर २-१५, आर्यन कुमार १-३); सामनावीर – आर्यन कुमार.
DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पूना क्लब, पुणे क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील पहिल्या सामन्यात अभिनव त्यागी (१५३ धावा), आरव गिनी (१२६ धावा व २-१८), मितांशू मंडल ५-२४) यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने रायझिंग चॅलेंजर बॉईज संघाचा ४२१ धावांनी धुव्वा उडवत आगेकूच कायम ठेवली.






