Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक

England Beat France in fifa: फिफा विश्वचषक २०२६ मधील इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अत्यंत रोमांचक ठरला. ज्यात एकूण १० गोल झाले. इंग्लंडने हा सामना ६-४ अशा फरकाने जिंकून विश्वचषकात तिसरे स्थान पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 02:53 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा दमदार विजय
  • फ्रान्सचा ६-४ ने पराभव
  • विश्वचषक २०२६ मध्ये पटकावले तिसरे स्थान
इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषक २०२६ मधील तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळला गेला. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. १९८२ नंतर विश्वचषकातील असा पहिलाच सामना ठरला, ज्यात सर्वाधिक १० गोल नोंदवले गेले. या थरारक सामन्यात इंग्लंडने फ्रान्सचा ६-४ असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकातील तिसऱ्या स्थानावर कब्जा करत कांस्यपदक पटकावले. पहिल्या हाफच्या अखेरीस इंग्लंड ४-० ने आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने जोरदार पुनरागमन केले, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

टोकियोत तिरंगा फडकला! पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026; फायनलमध्ये अकाने यामागुचीला चारली धूळ

पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने एकतर्फी वर्चस्व

फ्रान्सविरुद्धच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात, इंग्लंडने पहिल्या हाफपासूनच अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामध्ये त्यांचा कर्णधार डेक्लन राइसने खेळाच्या तिसऱ्या मिनिटाला पहिला गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, १८ व्या मिनिटाला एझरी कोन्साने हेडरद्वारे चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला आणि इंग्लंडने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. त्याच वेळी, बुकायो साकाने खेळाच्या ३७ व्या आणि ४३ व्या मिनिटाला सलग दोन गोल करून, पहिल्या हाफच्या अखेरीस इंग्लंडची आघाडी ४-० अशी वाढवली.

दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचे कमबॅक, पण इंग्लंडने जिंकला सामना

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने दमदार कमबॅक केले.फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक डिडिएर डेचॉसू यांनी एकाच वेळी चार बदल केले. स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेने ४८ व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या ६ मिनिटानंतर ब्रॅडली बारकोलाने ५४ व्या मिनिटाला फ्रान्ससाठी दुसरा गोल केला आणि स्कोअर ४-२ वर आणला. किलियन एम्बाप्पेने ६६ व्या मिनिटाला सामन्यातील आपला दुसरा गोल करून फ्रान्सला सामन्यात परत आणले आणि स्कोअर ४-३ असा केला. दरम्यान, इंग्लंडने फ्रान्सच्या एका चुकीचा फायदा उचलला आणि बुकायो साकाने ८७ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर लगेचच फ्रान्सच्या डेम्बेलेने ९० व्या मिनिटाला गोल करून स्कोअर ५-४ असा केला. परंतु, इंज्युरी टाईमच्या ९८ व्या मिनिटाला ज्यूड बेलिंगहॅमने केलेल्या गोलने इंग्लंडचा विजय निश्चित केला.

एम्बाप्पेने मोडला मेस्सीचा विक्रम

एमबाप्पेने या सामन्यात २ गोल केले. एमबाप्पेने फिफाच्या संपूर्ण स्पर्धेत २२ गोल करून लिओनेल मेस्सीचा २१ गोल्सचा रेकॉर्ड मोडला. १० गोल्सह तो या स्पर्धेतील गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळे गोल्डन बूटच्या शर्यतीत देखील रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक डिडिएर डॅशॅम्पचा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. सामन्यानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुशेलने डिडिएर यांना मिठी मारली.

Cette image de Tuchel et Deschamps à la fin du match ❤️ #FRAANG #ANGFRA pic.twitter.com/k49JVkpU7e — Emilie Lopez ⭐️⭐️ (@emilielopez) July 18, 2026

IND vs ENG: टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ची लढत! लॉर्ड्सची खेळपट्टी ठरणार गेमचेंजर; जाणून घ्या पिच रिपोर्ट, संभाव्य प्लेइंग 11

Web Title: England vs france fifa world cup 2026 third place match bronze medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • England
  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • France

संबंधित बातम्या

Lionel Messi रचणार इतिहास? अर्जेंटिना-स्पेन फायनलमध्ये मोडू ‘हे’ शकतो 5 मोठे विक्रम
1

Lionel Messi रचणार इतिहास? अर्जेंटिना-स्पेन फायनलमध्ये मोडू ‘हे’ शकतो 5 मोठे विक्रम

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
2

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल
3

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल

Fifa World Cup 2026: विश्वकप जिंकणाऱ्या टीमला मिळणार खास ‘भेट’, Medal सह खास चॅम्पियनशिप रिंग
4

Fifa World Cup 2026: विश्वकप जिंकणाऱ्या टीमला मिळणार खास ‘भेट’, Medal सह खास चॅम्पियनशिप रिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.