Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

World News : फ्रान्समध्ये वाढती महागाई, इंधन दर आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. १७ ऑक्टोबर रोजी मार्सेलमध्ये आंदोलकांनी महापालिका पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली. देशभरातील ८० हून अधिक मोर्चांमुळे सरकारसमोरील आव्हान वाढले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 17, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आंदोलन 
  • मार्सेलमध्ये पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड
  • देशभरात ८० हून अधिक मोर्चे ;सरकारसमोर आव्हान
World News : जगभरात बघावे तिकडे युद्धाचे , आंदोलनाचे , हिंसेचे पेव फुटले आहे . ज्याला वाट्टेल तसा दंगा घालत आहेत . सगळे राजकीय नेते आपापला फायदा बघत आहेत . प्रत्येकाला आपलेच खरे असे वाटू लागले आहे . मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या मनमानीमुळे युद्ध थांबायच नाव घेत नाही , वरकरणी नवीन नवीन खेळाडू यात सामील होऊन जगभरातील सर्वसामान्य जनता वेठीस ठेवली जात .

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेलाचे संकट वाढले आहे . तेल हा जगण्यातील बऱ्याच अविभाज्य गोष्टींशी जोडला गेला असल्याने त्याचे पडसाद वेगवेगळा क्षेत्रावर पडत आहेत . यामुळे जगभरात जीवनावश्यक गोष्टींची किंमत वाढली असून जगभरात अनेक देश यात भरडले जात आहेत . याच धर्तीवर फ्रान्समध्ये वाढती महागाई , इंधनाचे वाढते दर आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्या या सगळ्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने शनिवारी १७ ऑक्टोबर ला हिंसक वळण घेतले आहे.

फ्रान्समध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले असताना दक्षिण फ्रान्समध्ये मार्सेल शहरात परिस्थिती आणखीच चिघळली आहे.शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून , पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात जुंपली आहे . अश्रू धुराच्या नळकांड्याची इकडून तिकडे फेकाफेकी होत आहे . आंदोलक रस्त्यात येईल ती सरकारी मालमत्ता पेटवून देत आहेत . आपला राग व्यक्त करत आहेत . पोलिसांनाही रेटून चोप दिला जात आहे .

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

युरोपातील लोकं त्यांच्या सुखसोयी महाग झाल्यावर प्रचंड अस्वस्था लगेच रस्त्यांवर येऊन दाखवतात . तिथली समाज आणि राजकीय व्यवस्था वेगळी आहे . नागरिकांसाठीच सरकार आणि लोकप्रतिनिधी आहेत . ते सेवक आहेत साहेब नाहीत . यामुळे राजकारण्यांच्या राजकारणामुळे सामान्य जनतेला बसणारे चटके, उगाच एका पक्षाची किंवा नेत्याची भक्ती करून युरोपातील लोकं त्रासात राहत बसत नाहीत .

यामुळे चाललेल्या युद्धत युरोपला तेल पुरवठा होणाऱ्या सौदीच्या अरामको कंपनीने युरोपला तेल पुरवठा काही काळासाठी खंडित करून फ्रान्समधल्या वाढत्या महागाईला एक प्रकारे हातभार लावला आहे . यामुळे फ्रान्समधील लोकांचे आर्थिक गणित गडबडले आहे . पेट्रोल डिझेलचे वाढते दर , जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कमी होत चाललेली त्यांची कमाई यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे . याच मुद्यांवरून यलो व्हेस्ट चळवळीशी संबंधित आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केले आहे .

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

मार्सेलमध्ये पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड

मार्सेल मधील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी ला कानेबिएर परिसरातील महापालिका पोलीस ठाण्यावर हल्ला केला . आंदोलक इमारतीत घुसले आणि तेथे तोडफोड करण्यात आली . या घटनेमुळे शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्याचे वृत्त आहे .

देशभरात ८० हून अधिक मोर्चे ;सरकारसमोर आव्हान

फ्रान्समधील या आंदोलनाला विद्यार्थी , कामगार संघटना अंडी विविध सामाजिक संघटनांचा सुद्धा पाठिंबा मिळाला असून देशभरात हे आंदोलन आता गाजत आहे . तसेच देशाबाहेर ही या आंदोलनाची चर्चा होताना दिसत आहे . मॅक्रोन च्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरली आहेत . देशभरात ८० हून जास्त मोर्चे आणि शेकडो निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत . विद्यार्थ्यांकडून भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांविरोधात दणदणीत आवाज उठवण्यात येत आहे .

 

Web Title: World news protests erupt in france demonstrators attempt to break into mayors office cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Emanuel Macron
  • France
  • Marathi News
  • Protest
  • World news

संबंधित बातम्या

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
1

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar:  ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”
2

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar: ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
3

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.