Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे नाव लक्षात ठेवा…” सात वर्षांपूर्वीच इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराने जेमिमाबद्दल केली होती भविष्यवाणी; पोस्ट Viral

महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे कौतुक होत आहे. जेमिमाबद्दलचे सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल झाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 07:39 PM
"Remember this name..." This former England captain had predicted about Jemima seven years ago; Post goes viral

"Remember this name..." This former England captain had predicted about Jemima seven years ago; Post goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Nasser Hussein’s post about Jemima Rodriguez goes viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी या मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला गेला.  या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १२५ धावांचे लक्ष्य उभे केले होते.  प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने १३.२ ओव्हरमध्ये ६ गडी गमावत हे लक्ष्य सहज गाठले आणि भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु, हा सामना बाजूलाच राहिला. कारण चर्चा गुरुवारी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज या नावाची होती.

हेही वाचा : दुर्दैवी! पुन्हा ‘फिल ह्युजेस’सारखा अपघात! मान व डोक्याला लागला चेंडू; 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू

30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे महिला विश्वचषकाचा सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांसाठी ३३९ धावांचे  लक्ष्य दिले होते. भारतीय महिला संघाने हे विक्रमी लक्ष्य गाठले आणि अंतिम सामन्यात धडक मारली. या विजयात जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूत १२७ धावांची विजय मिळवून देणारी खेळी केली होती. त्यामुळे ती कौतुकाचा विषय ठरली आहे.

जेमिमाच्या या खेळीचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. जनतेपासून ते उच्चभ्रूंपर्यंत सर्वजण रॉड्रिग्जबद्दल बोलताना दिसत आहे. दरम्यान, सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल होत आहे. त्यांनी एक भविष्यवाणी केली होती. जी आता खरी ठरली आहे. चाहते या पोस्टबद्दल बोलू लागले आहेत.

त्या पोस्टमध्ये काय आहे?

इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनची ही पोस्ट २०१७ च्या भारत दौऱ्यातील आहे. यामध्ये, माजी कर्णधार नासेर हुसेन जेमिमासोबतचा एक फोटो त्याच्या भविष्यवाणीसह पोस्ट केलेला आहे. त्याने लिहिले आहे की, “हे नाव लक्षात ठेवा… जेमिमा रॉड्रिग्ज… आज जेमिमासोबत काही थ्रो-डाउन केले. ती भारतासाठी एक स्टार खेळाडू होणार आहे.”

It’s so humbling to see Nasser Hussain just in shorts throwing down on the streets. Didn’t respect him as much when he played, but seems like a genuinely nice human. And what a call this was 7 years ago. https://t.co/gxzeqfjVve — Vin United (@Iam_vin) October 31, 2025

हेही वाचा : IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…

जेमिमा बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी खेळत असून तिने आधीच आपले नाव कमावले आहे. परंतु, गुरुवारी झालेल्या सेमीफायनल सामन्यात १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची नाबाद खेळी करून जेमिमा केवळ स्टारच नाही तर भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार खेळाडू बनली असल्याचे आता बोलले जात आहे. एकंदरीत, नासेर हुसेनने केलेली भविष्यवाणी पूर्णपणे खरी ठरल्याचे दिसत आहे.

Web Title: Englands nasser hussains prediction about jemima from seven years ago goes viral ind w vs aus w

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • Bear Viral Video
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND w vs AUS W
  • Jemimah Rodrigues
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…
1

IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंचा टीम इंडियाला धोबीपछाड! 4 विकेट्सने सामना जिंकत ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी
2

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंचा टीम इंडियाला धोबीपछाड! 4 विकेट्सने सामना जिंकत ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 
3

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 

Women’s World Cup : सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर दिले निवृतीचे संकेत, झाली भावूक
4

Women’s World Cup : सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर दिले निवृतीचे संकेत, झाली भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.