
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली या मालिकेमध्ये भारताचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कमालीची कामगिरी केली आहे. या मालिकेमध्ये विराट कोहली याने दोन शकतेही झळकावली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आज, ९ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली, ज्यामुळे टीम इंडियाला २-१ अशी मालिका जिंकता आली.
दोघांनीही आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते थेट न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसतील. रोहित आणि विराट टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा भाग नसल्यामुळे एडेन मार्कराम खूप आनंदी दिसत होता. त्याला हे देखील माहित आहे की जर ते तिथे असते तर त्याला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली नसती.
Ashes 2025 : कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन, पण मुख्य वेगवान गोलंदाज अॅशेस मालिकेतून बाहेर; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
कटकमधील टी-२० सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्कराम उपस्थित होता. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख करत म्हटले की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-२० संघाचा भाग नाहीत ही चांगली गोष्ट आहे. तरीही, भारताचा संघ अजूनही चांगला आहे.” टी-२० मालिकेतील दोन्ही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास निःसंशयपणे वाढेल. तथापि, हे देखील पूर्णपणे खरे आहे की भारताचा सध्याचा टी-२० संघ देखील खूप मजबूत आहे आणि दक्षिण आफ्रिकेसाठी त्यांना पराभूत करणे कठीण होईल.
Aiden Markram said, “it’s great that Virat Kohli and Rohit Sharma are not part of the T20i side, but still it’s a great Indian team”. pic.twitter.com/w7m0XphY3u — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2025
कर्णधार एडेन मार्कराम यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी२० मालिकेच्या योजनांबद्दल चर्चा केली. तो म्हणाला, “आम्ही काहीही वेगळे नियोजन केलेले नाही. हे टी२० क्रिकेट आहे आणि ते सर्वात मनोरंजक आहे. आम्हाला अशा प्रकारे खेळायला आवडते. आम्हाला आमच्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळावे असे वाटते. उद्यापासून एका नवीन मालिकेची सुरुवात होत आहे. आम्ही अद्याप आमचे प्लेइंग इलेव्हन निवडलेले नाही, कारण काही गोष्टींवर अजूनही चर्चा करायची आहे.”
एडेन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रुईस, टोनी डी जॉर्गी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅनसेन, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), डोनोव्हन फेरेरा (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, क्वेना एमफाका, लुंगी एनगिडी, अँरिच नॉर्टजे.