Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 3rd ODI: रविवारचा सामना ठरणार ‘करो या मरो’; इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी ‘गिल सेना’ सज्ज! पण सामन्याची वेळ काय?

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड वन-डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना १९ जुलै रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र ४०० वा सामना खेळण्याचा महाविक्रम रचणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 08:12 PM
IND vs ENG 3rd ODI (Photo Credit- X)

IND vs ENG 3rd ODI (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • रविवारचा सामना ठरणार ‘करो या मरो’
  • इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी ‘गिल सेना’ सज्ज!
  • पण सामन्याची वेळ काय?
IND vs ENG 3rd ODI Timeg: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वन-डे मालिका सध्या अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक वळणावर पोहोचली आहे. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार कमबॅक करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे आता या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना जो संघ जिंकेल, तोच मालिकेचा खरा मानकरी ठरेल. हा महत्त्वाचा सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेवूया..

आता मालिका जिंकण्यावर भारताचे लक्ष

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. टी-२० मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ झाला होता. मात्र, वन-डे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे क्लीन स्वीपचे सावट पूर्णपणे टळले आहे. आता १९ जुलै रोजी (रविवार) होणारा हा सामना टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा असेल. या अंतिम सामन्यासह भारतीय संघाचा हा इंग्लंड दौरा देखील संपणार आहे. त्यामुळे मालिका विजयाने दौऱ्याचा समारोप करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

दुपारी ३:३० वाजता होणार सामन्याची सुरुवात

वेळेचा विचार केला तर, हा तिसरा सामना भारतीय वेळेनुसार (IST) दुपारी साडेतीन वाजता (३:३० PM) सुरू होईल, तर सामन्याचा टॉस (फेक) अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी ३:०० वाजता होईल. या मालिकेतील पहिला सामना याच वेळेत झाला होता, तर दुसरा सामना संध्याकाळी साडेपाच वाजता खेळवला गेला होता. रविवारचा हा निर्णायक सामना साडेतीन वाजता सुरू होऊन रात्री साधारण साडेदहा वाजेपर्यंत चालेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहली रचणार ऐतिहासिक महाविक्रम!

या अंतिम सामन्यात संपूर्ण जगाचे लक्ष भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असणार आहे. एकीकडे रोहित शर्माच्या वन-डे करिअरचा हा शेवटचा सामना असू शकतो आणि तो निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशा चर्चा क्रीडा वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल; परंतु या सामन्यात रोहित आणि विराट मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचला जाईल. रोहित आणि विराट एकत्र खेळत असलेला हा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे, जो क्रिकेट जगतातील एक अभूतपूर्व विक्रम आहे. अशा ऐतिहासिक सामन्यात हे दोन्ही दिग्गज कशी फलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs ENG: टीम इंडियाच्या अडचणीत भर; लॉर्ड्स वनडेपूर्वी विजयाचा हिरो मालिकेबाहेर

Web Title: Ind vs eng 3rd odi match schedule date time rohit sharma virat kohli 400th international match marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • cricket news
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • Team India

संबंधित बातम्या

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं
1

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार
2

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
3

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
4

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.