Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

Indias ODI ICC Rankings: भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका २-२ ने गमावली. यामुळे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत याचा धक्का बसला आहे. असे असले तरी, संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 04:40 PM
इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडकडून पराभवाचा फटका
  • ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का
  • भारताचे अव्वल स्थान धोक्यात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना रविवारी (दि. १९ ) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यासोबतच ३ सामन्यांची मालिका २-१ ने गमावली. या पराभवामुळे भारतीय संघाच्या आयसीसी क्रमवारीत (ICC ODI Ramkings) घसरण झाली आहे. संघ सध्या पहिल्या क्रमांकावर असला तरी, त्याचे मानांकन घसरले आहे, त्यामुळे अव्वल स्थान आता धोक्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चार एकदिवसीय मालिका खेळल्या असून, त्यापैकी केवळ एक जिंकली आहे आणि तीन गमावल्या आहेत .

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

भारताचे अव्वल स्थान धोक्यात

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १४ जुलै रोजी खेळला गेला. पण सामन्याच्या आदल्या दिवशी १३ जुलैच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये, भारतीय संघ १२१ च्या रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर होता. तर दुसरीकडे, इंग्लंडचे रेटिंग ८९ होते, ज्यामुळे ते आठव्या स्थानावर होते. परंतु, जसजसे सामने झाले, तसतसे चित्र बदलले.

२० जुलै रोजीच्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ आधीच पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु त्याचे रेटिंग १२१ वरून ११६ पर्यंत घसरले आहे. इंग्लंडचे रेटिंग, जे ८९ होते, ते आता ९३ पर्यंत वाढले आहे आणि संघ आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियाचा दोन सामन्यातील पराभवामुळे संघाला एकदिवसीय रँकिमध्ये झटका लागला आहे. तर, इंग्लंडला याचा चांगलाच फायदा झाला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कमी अंतर

भारताचे रेटिंग ११६ आहे, तर न्यूझीलंड १११ च्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ दोघांमध्ये फक्त पाच गुणांचा फरक आहे. मालिका गमावल्यामुळे हा अंतर कमी झाला आहे. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंडचा संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भारतीय संघाला आपले अव्वल स्थान टिकवून ठेवणे कठीण होईल. अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर परतावे लागेल. न्यूझीलंडने सामने जिंकल्यास टीम इंडिया पहिल्या स्थानावरुन खाली येईल.

लॉर्डस्वर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला २७ धावांनी पराभव पत्कारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथन फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने ३८७ धावा करत भारतासमोर ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया ३६० धावा करु शकली.

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट

Web Title: India vs england odi series loss team india icc ranking number one spot under threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • ICC ODI Rankings
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Team India

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
3

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.