केवळ ५ लाख लोकसंख्या असलेल्या या लहान देशाने, आपल्या गटातील तिन्ही सामने अपराजित राहून इतिहास रचला आहे. आता, ३२ संघांच्या फेरीत केप व्हर्डेसमोर आणखी एक मोठे आव्हान आहे. त्यांचा पुढील सामना ४ जुलै रोजी गतविजेत्या अर्जेंटिनाशी मियामी येथे होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तशी खरी स्पर्धा नसली तरी, अर्जेंटिना हा खूपच मोटा संघ आहे. परंतु, केप व्हर्डेसाठी इतिहासात आपले नाव कोरण्याची ही एक उत्तम संधी आहे. हा संघ आणखी एक अनपेक्षित विजय मिळवून अव्वल १६ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
केप व्हर्डेच्या ऐतिहासिक कामगिरीचा सर्वात मोठा नायक त्यांचा ४० वर्षीय गोलकीपर, वोझिन्हा होता. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात, वोझिन्हाने तीन आश्चर्यकारक बचाव केले, ज्यामुळे सौदी अरेबिया थक्क झाला . पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाइममध्ये, त्याने मोहम्मद कानोचा एक शानदार हेडर अडवून सौदी अरेबियाला आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर, दुसऱ्या हाफमध्ये, त्याने उडी मारून मोहम्मद अबू अल-शमातचा एक धोकादायक शॉट अडवला. ९२ व्या मिनिटाला, वोझिन्हाने अब्दुल्ला अल-हमदानचा एक अचूक शॉट देखील अडवला आणि आपल्या संघाचे नॉकआऊटमधील स्थान निश्चित केले.
Spain’s victory secures their place in the knockouts! 💪#FIFAWorldCup — FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 27, 2026
आपला पहिला फिफा विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने एकही सामना न गमावता अपराजित राहून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आपल्या पहिल्या सामन्यात, केप व्हर्डे २०१० विश्वचषक विजेत्या स्पेनला ०-० ने सामना ड्रॉ करुन खळबळ उडवून दिली. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात, त्यांनी दमदार पुनरागमन करत दोन वेळच्या विजेत्या उरुग्वेविरुद्ध २-२ असा रोमांचक ड्रॉ केला. आता, सौदी अरेबियाला ०-० अशा बरोबरीत रोखून, या संघाने ३ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले, तर स्पेनने उरुग्वेला हरवून गटात अव्वल स्थान पटकावले.






