Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

England Vs France 3rd position Match Fifa 2026: फ्रान्स आणि इंग्लंड आता तिसऱ्या स्थानासाठी भिडणार आहेत. फायनलची संधी हुकल्यानंतर आता कांस्य पदक जिंकून सन्मानाने स्पर्धेचा शेवट करणे हे त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असेल. कधी अन् कुठे रंगणार सामना, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 18, 2026 | 04:31 PM
FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
Follow Us
Follow Us:
  • फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
  • कधी रंगणार सामना?
  • गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे आघाडी घेणार?
फ्रान्स आणि इंग्लंडचे फिफा विश्वचषक २०२६ च्या फानलमध्ये पोहचण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले तरीही प्रवास अजून संपलेला नाही. आता तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात फ्रान्स आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही संघांचे अंतिम फेरी गाठणे हेच ध्येय होते. परंतु, आता दोघांनाही कांस्यपदक जिंकून सन्मानाने स्पर्धेचा शेवट करण्याची संधी मिळाली आहे. कधी आणि केव्हा रंगणार हा सामना जाणून घेऊयात.

‘… त्या दिवशी मी क्रिकेट सोडून देईन’; निवृत्तीवर Rohit Sharma चे वक्तव्य व्हायरल

कधी रंगणार सामना?

फ्रान्स विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रविवारी (१९ जुलै) भारतीय प्रमाण वेळेनुसार खेळला जाईल. हा सामना मियामी स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे २:३० वाजता सामन्याला सुरूवात होईल. हा सामना युनाईट८ स्पोर्टवर थेट प्रक्षेपित होईल.

गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे आघाडी घेणार?

फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे या सामन्यात गोल्डन बूटच्या शर्यतीत कायम आहे. त्याचे आठ गोल असून तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीसोबत बरोबरीत आहे. परंतु, चार असिस्टमुळे मेस्सी सध्या टायब्रेकरमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडच्या हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम यांचे प्रत्येकी सहा गोल आहेत. त्यामुळे गोल्डन बूटची शर्यत देखील अधिक रोमाचंक झाली आहे.

हा डिडिएर डेशॅम्प्सचा शेवटचा सामना ?

फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांच्यासाठी राष्ट्रीय संघासोबतचा हा शेवटचा सामना असेल. त्यांनी सांगितले की, फ्रेंच जर्सी घालून संघाचे नेतृत्व करणे हा त्यांच्या प्रोफेशनल कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान आहे. डेशॅम्प्सच्या प्रशिक्षणाखाली फ्रान्सने २०१८ चा विश्वचषक जिंकला आणि २०२२ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.

इब्राहिमा – टुशेल काय म्हणाले?

फ्रान्सचा डिफेन्सपटू इब्राहिमा कोनाटे म्हणाला की, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नव्हती, पण हा एक अधिकृत विश्वचषक सामना आहे. तो म्हणाला की फ्रान्स आणि इंग्लंड यांचा मोठा इतिहास आहे आणि संघ या सामन्यासाठी तयार आहे.

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक थॉमस टुशेल म्हणाले की, उपांत्य फेरीतील चारही संघांचे अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न होते, पण आता हा एक अधिकृत विश्वचषक सामना असल्याने, इंग्लंडला ६० वर्षांतील सर्वोत्तम विश्वचषक कामगिरी करण्याची संधी आहे. ते म्हणाले की, संघाने संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली मानसिकता पुन्हा एकदा दाखवली पाहिजे.

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल

Web Title: Fifa world cup 2026 france vs england third place match date time mbappe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • England
  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Football Tournament
  • France

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.