Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudhakar Adhikari: ‘ड्युटी’ प्रथम! लग्नाच्या दिवशी मैदानावर उतरले, शतक ठोकले… मुंबईच्या माजी क्रिकेटरचा अविस्मरणीय किस्सा!

माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांचा अविश्वसनीय किस्सा! १५ नोव्हेंबर १९६५ रोजी त्यांनी लग्नानंतर थेट रणजी ट्रॉफी सामना खेळला आणि शतक ठोकून रिसेप्शनला परतले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 31, 2025 | 10:14 AM
लग्नाच्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजाने रणजीमध्ये ठोकले शतक (Photo Credit - X)

लग्नाच्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजाने रणजीमध्ये ठोकले शतक (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • १५ नोव्हेंबर १९६५ चा ऐतिहासिक क्षण
  • लग्नानंतर बॅट घेऊन मैदानात धावले
  • थेट रिसेप्शनला परतले!
मुंबई: भारतीय क्रिकेटरसिकांचे प्रेम जगजाहीर आहे, पण त्याच खेळासाठी एखादा खेळाडू कोणती पराकाष्ठा करू शकतो, याचे एक अविश्वसनीय उदाहरण मुंबईच्या क्रिकेट इतिहासात नोंदवले गेले आहे. मुंबईचे माजी फलंदाज सुधाकर अधिकारी (Sudhakar Adhikari) यांनी आपल्या लग्नाच्याच दिवशी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामना खेळून केवळ हजेरी लावली नाही, तर संघासाठी महत्त्वपूर्ण शतकही झळकावले. क्रिकेटवरील त्यांचे हे वेडे प्रेम आणि संघातील जागा टिकवण्याची त्यांची जिद्द, मुंबईच्या ‘क्रिकेट कल्चर’ची महती सांगते.

विवाहसोहळा एका बाजूला, रणजीची ‘ड्युटी’ दुसऱ्या बाजूला

हा किस्सा आहे १५ नोव्हेंबर १९६५ चा. सुधाकर अधिकारी यांचा विवाहसोहळा त्याच दिवशी सकाळी पार पडला. साधारणपणे या दिवशी प्रत्येक जण सुट्टी घेतो किंवा लग्नाच्या गडबडीत असतो. पण अधिकारी यांचा निश्चय वेगळा होता. विवाहबंधन पार पडताच जराही वेळ न घालवता, त्यांनी थेट बॅट घेतली आणि ते मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पोहोचले.

मैदानात घडला ऐतिहासिक पराक्रम

सुधाकर अधिकारी मैदानात केवळ औपचारिक उपस्थितीसाठी आले नव्हते. त्यांनी दमदार फलंदाजी करत संघासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि अविस्मरणीय शतक झळकावले. हा पराक्रम पूर्ण करून, सामना संपल्यावर ते सायंकाळी आयोजित केलेल्या आपल्या विवाह रिसेप्शन कार्यक्रमासाठी परतले आणि पाहुण्याचे स्वागत केले. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी, कर्तव्य म्हणून मैदानावर उतरणे आणि शतक ठोकणे, हा एक असाधारण त्याग आणि खेळाप्रतीची निष्ठा दर्शवतो.

IND vs AUS Semi Final : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर हरमनप्रीत कौरचे मोठे विधान, विजयाचे श्रेय दिले या खेळाडूला!

संघातील जागा टिकवण्याची तीव्र जिद्द

अधिकारी यांच्या या कृतीमागे केवळ क्रिकेटवरील उत्कट प्रेम नव्हते, तर त्यावेळच्या मुंबई रणजी संघातील स्थान टिकवण्याची तीव्र इच्छा होती. १९६० च्या दशकात मुंबईचा संघ इतका तगडा आणि गुणवत्तापूर्ण होता की, संघात स्थान मिळवणे हेच एक मोठे आव्हान होते. त्यावेळी मुंबईच्या संघाने खुप रणजी ट्राॅफी जिंकल्या होत्या. अन् त्यावेळी मुंबई संघाकडून ५ ते ६ खेळाडू भारतीय संघात असायचे.

सुधाकर अधिकारी यांचे मत असे होते की, “या काळात संघात जागा टिकवणे ही तारेवरची कसरत होती. जर मी सामना टाळला असता, तर दुसऱ्या खेळाडूला संधी मिळाली असती. आणि त्याने उत्तम कामगिरी, विशेषतः शतक ठोकल्यास, मला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागले असते.”

याच कारणामुळे, कोणतीही किंमत मोजून सामना न सोडण्याची जिद्द त्यांनी दाखवली आणि लग्नाच्या दिवशी शतक ठोकून त्यांनी आपले स्थान पक्के केले. मुंबईच्या रंगात खेळणे हा खेळाडूंसाठी मोठा अभिमान होता आणि संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खेळाडूंना अशा मोठ्या त्याग आणि प्रयत्नांची गरज होती, हेच या उदाहरणातून स्पष्ट होते.

अधिकारी यांची कारकीर्द आणि निधन

माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांनी १९५९ ते १९७१ या काळात मुंबई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत ६५ सामने खेळले, ज्यात त्यांनी ११ शतकांच्या मदतीने ३,७७९ धावा केल्या होत्या. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक म्हणजे १९६२-६३ च्या इराणी करंडक सामन्यातील कामगिरी. या सामन्यात त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारताच्या (Rest of India) विरुद्ध मुंबईसाठी १७३ धावांची शानदार खेळी केली होती. सुधाकर अधिकारी यांचे निधन शुक्रवार, २९ जुलै २०२२ रोजी झाले ते ८२ वर्षाचे होते.

Women’s World Cup : मुबंईच्या राणीने शेवटी करुन दाखवलचं…! विजयानंतर व्यक्त केल्या भावना, अश्रू झाले अनावर

Web Title: Former cricketer sudhakar adhikari scored a century on his wedding day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • cricket
  • Mumbai
  • Mumbai cricket
  • ranji trophy

संबंधित बातम्या

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा
1

Mumbai Collector Meeting: महसूल कामकाज आता होणार अधिक वेगवान! मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची विकासकांशी चर्चा

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?
2

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला
3

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद
4

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.