
आज Gautam Gambhir 'भाई' का बर्थडे, सेलिब्रेशन तर होणारच; 'GG' वर शुभेच्छांचा वर्षाव..!
युवराजने गंभीरला Instagram वर शुभेच्छा दिल्या. ज्यात तो म्हणतो की, GG, तुला ठाऊक आहे की, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे व माझी इच्छा आहे की, तू आणखीन बळकट व्हावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाई. खूप पुढे जा आणि आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे. खूप खूप प्रेम.
सुरेश रैनाने एक्सवर शुभेच्छा देताना लिहिले की, मैदानावरील एक फायटर, ह्रदयापासून एक विजेता आणि एक अशी व्यक्ती जो नेहमीच भारतीय क्रिकेटसाठी ‘खंबीर’पणे उभा राहतो. तुला चांगले आरोग्य लाभो. आनंदी रहा आणि तू पुढील प्रवासात आणखीन काही विक्रम आपल्या नावे करो. प्रेरणा देत रहा व नेतृत्त्व करत रहा.
BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये लिहिले की, क्रिकेटप्रती तुमची प्रचंड आवड, स्पर्धात्मक वृत्ती आणि भारतीय क्रिकेटप्रती असलेली अढळ बांधिलकी आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. भारतीय क्रिकेटचा विकासात योगदान देत रहा. तुझ्यासाठी येणारे वर्ष अधिक शानदार राहोत.
DDCA चे अध्यक्ष रोहन जेटली यांनीही गंभीरला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा गौतम गंभीर. तुझ्या चांगले आरोग्य, आनंद आणि सलग यशाबाबत देवाकडे प्रार्थना करतो. दिल्लीकरांना आपला मुलगा व भारतीय क्रिकेटमधील त्याच्या अमुल्य योगदानाबाबत नेहमीच अभिमान असेल. तू भविष्यातील पीढ्यांना प्रेरणा देत आहेस.
IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा
2003 ते 2016 या काळात डावखुरा सलामी फलंदाज असलेल्या गंभीरने भारतासाठी 58 टेस्ट, 147 वनडे आणि 37 टी-20 सामन्यात खेळण्याचा आनंद घेतला आहे. टेस्टमध्ये त्याने 9 शतक आणि 22 अर्धशतकाच्या मदतीने 4,154 धावा केल्या आहेत.
तर वनडेत त्याने 11 शतक आणि 34 अर्धशतकाच्या जोरावर 5,238 धावा आणि टी-20 मध्ये 7 अर्धशतकांसह 932 धावा केल्या आहेत. वनडे विश्वचषक 2011 आणि टी-20 विश्वचषक 2007 मध्ये भारताला विजय बनवण्यास अविस्मरणीय भूमिका बजावणाऱ्या गंभीरने 2018 साली क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून निवृत्ती घेतली.
गंभीर आता प्रशिक्षकाच्या रुपात भारतीय क्रिकेटमधील आपली दुसरी इनिंग खेळत आहे. गंभीरला 9 जुलै 2024 साली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडण्यात आले. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 विश्वचषक 2026 जिंकून दिले आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या रुपात त्याचा कार्यकाळ वनडे विश्वचषक 2027 पर्यंत आहे.
वाघाची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री! ‘या’ संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून Yuvraj Singh ची नियुक्ती
Ans: गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला.
Ans: ९ जुलै २०२४ रोजी त्याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर झाली.
Ans: गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून 2018 साली निवृत्ती घेतली.