पहा Video: ग्लेन फिलिप्स जेव्हा 'सुपरमॅन' बनतो! हवेत सुर मारून क्षणात टिपला अफलातून झेल.. (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारतासमोर 252 धावांचे आव्हान उभे केले आहे. न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावून 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या डावाची सुरवातही धामकेदार झालीय आहे. रोहित शर्मा आणि गिल या जोडीने चांगली सुरवात करून दिली. या पूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा होत आहे. या स्पर्धेत त्याने अनेक अफलातून झेल घेतले आहे. आजच्या सामन्यात देखील त्याने असाच एक अफलातून झेल घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्याने शुभमन गिलचा झेल पकडला आहे. फिलिप्सने एका हाताने झेल पकडून गिल तंबूत पाठवले.
दुबईत खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियासाठी स्फोटक अर्धशतकीय खेळी केली. त्यांतर तो 73 धावा करून रचिनचा शिकार ठरला. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलही त्याला चांगली साथ दिली. दोघांमध्ये 18 षटकांत 100 धावांची भागीदारी झाली होती. टीम इंडिया सहज टार्गेट पूर्ण करेल असे वाटत असताना न्यूझीलंड भारताच्या पहिल्या विकेट्सची वाट बघत होता. इतक्यात फिलिप्स संघासाठी धावत आला आणि त्याने गिलचा आश्चर्यकारक झेल घेतला.
कर्णधार मिचेल सँटनर गोलंदाजी 19 वी ओव्हर टाकायला आला. शुभमन गिलने चौथ्या चेंडू टोलवला खरा पण त्याच्या बॅटमधून निघालेला शॉट वेगाने जात असताना फिलिप्सने हेवेत उंच उडी घेऊन तो चेंडू एका हाताने लपकला. तेव्हा क्षणात काय घडलं कुणालाच कळलं नाही आणि गिल झेलबाद झाला. संपूर्ण किवी संघाकडून फिलिप्सचे कौतुक करण्यात आले. काही खेळाडूंनी त्याला मिठी देखील मारली. फिलिप्सने हा झेल फक्त 0.78 सेकंदांत घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्लेन फिलिप्सने यापूर्वीही असेच अफलातून झेल घेतले आहेत. फिलिप्सने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानचा हवेत सुर मारून झेल पकडला होता. त्यानंतर भारताविरुद्धच त्याच स्थितीत विराट कोहलीचा सुरेख झेल टिपला होता. यावेळी त्याने उजवीकडे डायव्हिंग केले आणि एका हाताने हा फलातून झेल घेतला आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.