Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! जसप्रीत बुमराहचा फिटनेस अहवाल प्राप्त

टीमचा हुकमी एक्का आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत सस्पेन्स आता संपला असून, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 07:16 PM
IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)

IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी!
  • जसप्रीत बुमराहचा फिटनेस अहवाल प्राप्त
  • हार्दिक पांड्यासमोर ‘प्लेइंग 11’ निवडण्याचे पेच
आयपीएल 2026 च्या (IPL 2026) रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. टीमचा हुकमी एक्का आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत सस्पेन्स आता संपला असून, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने (COE) बुमराहला हिरवा कंदील दिला असून, यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बीसीसीआयच्या ‘COE’ कडून फिटनेस रिपोर्ट जाहीर

सीझन सुरू होण्याला अवघे काही दिवस उरले असताना बुमराह अद्याप संघात सामील झाला नव्हता, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. बीसीसीआयने त्याला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले होते, जिथे त्याच्या फिटनेसची सखोल चाचणी घेण्यात आली. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या (ESPNcricinfo) अहवालानुसार, बुमराहला कोणत्याही प्रकारच्या दुखापतीचा धोका नाही. सध्या तो केवळ आपल्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करत आहे.

🚨 NO INJURY SCARE FOR JASPRIT BUMRAH 🚨 – Bumrah went to BCCI CoE to work on his strength and conditioning + workload, he is all set to play in the first match for Mumbai Indians. [Espn Cricinfo] pic.twitter.com/6jQxIq1RaF — Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2026

Gautam Gambhir च्या डीप फेक प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काय दिला निकाल? AI बाबतही केलं मोठं विधान

29 मार्चच्या सामन्यात पुनरागमन निश्चित?

बुमराहने आपले विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असून तो लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी होणाऱ्या मुंबईच्या महत्त्वपूर्ण सामन्यात बुमराह खेळताना दिसू शकतो. टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये त्याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीची लय तो आयपीएलमध्येही कायम राखण्यासाठी सज्ज आहे. बुमराहच्या समावेशामुळे मुंबईची गोलंदाजी आता अधिक धारदार आणि संतुलित झाली आहे.

हार्दिक पांड्यासमोर ‘प्लेइंग 11’ निवडण्याचे पेच

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या कागदावर अत्यंत मजबूत दिसत आहे. संघात एकापेक्षा एक ‘मॅच विनर’ खेळाडू असल्याने कर्णधार हार्दिक पांड्या समोर अंतिम 11 खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. संघात सध्या 15 ते 16 असे खेळाडू आहेत जे स्वबळावर सामना फिरवू शकतात. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या अनुभवी जोडीवर संपूर्ण हंगामात सर्वांच्या नजरा असतील.  संघात काही नवीन आणि स्फोटक खेळाडूंचा भरणा असल्याने प्रतिस्पर्धी संघांवर दबाव निर्माण करणे सोपे जाणार आहे.

सहाव्या जेतेपदाची सुवर्णसंधी

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यंदा बुमराहची तंदुरुस्ती आणि इतर खेळाडूंचा फॉर्म पाहता, मुंबईला सहावे जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. बुमराहचा अचूक यॉर्कर आणि रोहित-सूर्याची फटकेबाजी मुंबईला पुन्हा एकदा ‘विजेता’ बनवू शकते.

“मी धोनीला सांगेन…”, MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!

Web Title: Good news for mumbai indians ahead of ipl 2026 jasprit bumrahs fitness report received

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Jasprit Bumrah
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
1

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

‘कोणालाही बळीचा बकरा बनवायचं…’; दुखापतग्रस्त खेळाडूंवर VVS Laxman यांचे सडेतोड उत्तर, ब्रॉन्को टेस्टवरही स्पष्ट केली भूमिका
2

‘कोणालाही बळीचा बकरा बनवायचं…’; दुखापतग्रस्त खेळाडूंवर VVS Laxman यांचे सडेतोड उत्तर, ब्रॉन्को टेस्टवरही स्पष्ट केली भूमिका

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?
3

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

IND vs SL: घोर अन्याय, नुसता त्रास! बुमराह मालिकेबाहेर; मात्र संधी नाहीच, Mohammed Shami म्हणाला…
4

IND vs SL: घोर अन्याय, नुसता त्रास! बुमराह मालिकेबाहेर; मात्र संधी नाहीच, Mohammed Shami म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.