गुजरात सरकर घेणार खेळाडूंचा शोध (फोटो- ट्विटर)
गुजरात सरकर अशा प्रकारे जिनोमिक्स प्रकल्प राबवणारे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. गुजरात सरकर पहिल्या टप्प्यात चालू वर्षात 2000 खेळाडूंचे डीएनए सॅम्प्ल्स गोळा करून त्यांचे विश्लेषण आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. याची सुरुवात गुजरात राज्याच्या टेनिस असोसिएशनच्या टेनिस खेळाडूंचे सॅम्प्ल्स घेऊन झाली आहे.
गुजरात सरकार या प्रकल्पातून पुढील 5 वर्षांमध्ये एकूण 10000 नामांकित आणि गुणवत्ता असणारे खेळाडूंची संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे. या संशोधनातून भारतातील खेळाडूंचा आनुवंशिक आणि शारीरिक कामगिरीचा एकत्रित डेटा संकलित केला जाणार आहे.
Gujarat continues to redefine excellence in sports development..! Under the visionary leadership of Hon’ble PM Shri @narendramodi and CM Shri @Bhupendrapbjp, Gujarat proudly launches India’s first Sports Genomics Program, the landmark initiative harnesses DNA analysis and… https://t.co/pmkHj1yTSl — CMO Gujarat (@CMOGuj) August 28, 2026
डीएनए सॅम्प्ल्सने लहान वयातच खेळाडूंच्या शरीरात किती स्टॅमिना आहे. किती ताकद जास्त आहे, त्यामुळे खेळाडूला त्याची क्षमता ओळखून त्या किरकडा प्रकारात खेळणे सोपे जाऊ शकते. तसेच खेळाडूला स्नायू, पेशी किंवा नसांशी संबंधित दुखपतींचा धोका आहे का याचा देखील शोध घेता येणार आहे.
श्रीलंका गार अन् आता पाळी ‘या’ संघांची! Indian Cricket Team कोणविरुद्ध भिडणार? पहा वेळापत्रक
आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी गुजरात सरकारने नवा प्रकल्प सुरू केला आहे. आता यामध्ये गुजरात सरकार ॲथलेटिक्स, स्विमिंग (पोहणे), बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, ताइक्वांडो, जिम्नॅस्टिक्स आणि फेन्सिंग या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे.






