
Gulveer Singh
गुलवीर सिंगने एशियन गेम्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. आज झालेल्या पुरुषांच्या ५००० मीटर फायनलमध्ये गुलवीर सिंगने जबरदस्त कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच त्याने कांस्य पदक देखील जिंकले आहे. गुलवीरने शेवटपर्यंत आपली वेगमर्यादा कायम रखत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. गुलवीर सिंगने यापूर्वी याच स्पर्धेत 2 पदके जिंकली आहेत. त्यामुळे त्याने या स्पर्धेत एकूण तीन पदके जिंकत नवा इतिहास रचला आहे.
Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक
गुलवीर सिंगने एशियन गेम्सच्या इतिहासात एकाच स्पर्धेत ३ किंवा त्याहून अधिक वैयक्तिक पदके जिंकणारा खेळाडू ठरला आहे. ३ किंवा त्याहून अधिक वैयक्तिक पदके जिंकणारा गुलवीर सिंग हा पीटी उषा यांच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय ॲथलीट बनला आहे. महान धावपटू पीटी उषा यांनी १९८६ च्या सोल एशियन गेम्समध्ये ४ सुवर्ण आणि १ रौप्य अशी अभूतपूर्व ५ पदके जिंकली होती. त्यानंतर गेल्या ३८ वर्षांत कोणत्याही भारतीय ॲथलीटला एकाच स्पर्धेत ही किमया साधता आली नव्हती. गुलवीर सिंगने तो इतियहस रचला आहे.
जपान येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताचा स्टार धावपटू गुलवीर सिंह याने आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. पुरुषांच्या १५०० मीटरच्या अंतिम सामन्यात गुलवीरने अवघ्या ३ मिनिटे ३१.१३ सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले.१०००० मीटरच्या शर्यतीत त्याने २८ मिनिटे २९.३८ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. आज झालेल्या ५००० मीटरच्या शर्यतीत गुलवीरने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदक जिंकले आणि या स्पर्धेत ३ पदके जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.
‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral