Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya: दुसऱ्यांदा चढणार हार्दिक पंड्या बोहल्यावर! Mahieka Sharma सह IPL दरम्यानच बांधणार लग्नगाठ

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएल कर्णधार, हार्दिक पांड्या, लवकरच त्याची प्रेयसी महिका शर्मासोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 16, 2026 | 02:43 PM
हार्दिक पांड्या अडकणार लग्नबंधनात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हार्दिक पांड्या अडकणार लग्नबंधनात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्या करणार माहिका शर्माशी लग्न 
  • अहवालानुसार २२ रोजी बांधणार लग्नगाठ
  • घरगुती सोहळ्यात करणार लग्न 
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या दरम्यान, क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. हार्दिक सध्या मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टनुसार, हार्दिक आणि माहिका २२ मे रोजी एका खाजगी समारंभात विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे.

माहिका शर्मा सतत हार्दिकसह असते आणि अनेकदा आयपीएलदरम्यानही तिला प्रत्येक सामन्यात त्याच्यासह पाहण्यात आले आहे. काही सामन्यादरम्यान आपल्या टीमसह प्रवास न करता हार्दिकने माहिकासोबत प्रवास केल्याचेही दिसून आले होते. हार्दिक कप्तान म्हणून दोन्ही सीझनमध्ये अयशस्वी असल्याचे दिसून आले. पाच वेळा विजेती असणाऱ्या मुंबई इंडियन्सची फारच वाईट अवस्था असल्याचे सध्या चाहत्यांना पाहवत नाहीये. तरीही हार्दिकबाबत ही बातमी वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…

हार्दिकचे दुसरे लग्न 

हार्दिक पांड्याचे पहिले लग्न ३१ मे २०२० रोजी लॉकडाऊन दरम्यान नताशा स्टॅनकोविकसोबत झाले होते. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि चार वर्षांनंतर ते वेगळे झाले. हार्दिक आणि नताशा यांचा जुलै २०२४ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले, त्यात मॉडेल जस्मिनचेही नाव होते. काही काळ जस्मिनदेखील हार्दिकसह अनेक मॅचमध्ये दिसली होती. पण दोघे वेगळे झाले आणि त्यानंतर माहिका शर्मा हार्दिकच्या आयुष्यात आली. 

हार्दिकने अनेकदा माहिकाबाबत खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. वर्ल्ड कपदरम्यान दोघे जण भारताचा झेंडा घेऊन स्टेजवर झोपल्यामुळे हार्दिकवर टीकाही झाली होती. पण आता तो अखेर महिका शर्मासोबत लग्न करणार आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांना अगस्त्य पांड्या नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोट होऊनही ते आपल्या मुलाचे संगोपन एकत्र करत आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी 

या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र, तो मागील दोन सामन्यांमध्ये खेळलेला नाही. हार्दिक सध्या दुखापतग्रस्त असून, तो केकेआरविरुद्धच्या सामन्यात मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या कर्णधारपदाखाली सलग दोन हंगामांपासून संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

अशी अटकळ आहे की आयपीएल २०२६ संपल्यानंतर हार्दिकला केवळ कर्णधारपदावरूनच नव्हे, तर संघातूनही मुक्त केले जाऊ शकते. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामात संघाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. केकेआर व्यतिरिक्त, मुंबई या हंगामातील आपला शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळेल.

कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Hardik pandya mahieka sharma to tie knot in private ceremony on 22 may during ipl 2026 says report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
1

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
2

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
3

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.