हार्दिक पंड्याचे कर्णधारपद जाणार? (फोटो- ians)
मुंबई इंडियन्सचा 10 पैकी 3 सामन्यात विजय
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
Mumbai Indians: आयपीएलचा हंगाम सुरू होऊन आतापर्यंत 47 सामने झाले आहेत. आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. टॉप 4 साठी सर्व संघ प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान 5 वेळेस विजेपेतद पटकावणारे मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लागोपाठच्या पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, आता सर्वांच्या नजरा कर्णधार हार्दिक पांड्याच्या भवितव्यावर लागल्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र मॅनेजमेंट बदल करण्यापेक्षा स्थिरता ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे समजते आहे.
2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. ते कर्णधारपद हार्दिक पंड्याला सोपवण्यात आले. रोहित शर्मासारख्या यशस्वी कर्णधाराला बाजूला सारून घेतलेला हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या मॅनेजमेंटला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 2024 पासून 2026 पर्यंत मुंबईला विजेतेपद पटकवता आलेले नाही. मुंबईचा संघ अजूनही संघर्ष करतानाच दिसून येत आहे.
तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक
मुंबई पलटणने मारली बाजी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. आज पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.
MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…
एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती.






