Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित निधी भांडारकरने अव्वल मानांकित आद्या गवत्रेचा ५-११, ११-७, ११-५, ३-११, ११-६ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 04:04 PM
Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष
Follow Us
Follow Us:
  • टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या हरीश साळवीला विजेतेपद
  • डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक टेबल टेनिस
  • डेक्कन जिमखाना क्‍लब व शारदा टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडली स्पर्धा 
पुणे: डॉ. विद्या मुळ्ये व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक मास्टर्स महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ६५ वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या हरीश साळवी याने विजेतेपद संपादन केले. डेक्कन जिमखाना क्‍लब व शारदा टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ६५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित पुण्याच्या हरीश साळवी याने आपला शहर सहकारी प्रदीप गुप्ताचा ११-९, ११-९, ११-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

याआधीच्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात अव्वल मानांकित हरीश साळवीने ठाण्याच्या प्रफुल्ल वाघचाव ११-६, १०-१२, ११-३, ११-७ असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या लढतीत पुण्याच्या प्रदीप गुप्ताने तिसऱ्या मानांकित अविनाश जोशीचा ११-६, १२-१०, ८-११, ९-११, ११-९ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.

‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत  १९ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्वरूप भादलकरने दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदरचा ११-७, ११-४, ११-९ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. तिसऱ्या मानांकित  प्रणव घोलकरने सहाव्या मानांकित श्रेयस माणकेश्वरचे आव्हान ८-११, ११-८, १४-१२, ११-७ असे मोडीत काढले.

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित निधी भांडारकरने अव्वल मानांकित आद्या गवत्रेचा ५-११, ११-७, ११-५, ३-११, ११-६ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.  नीरजा देशमुख हिने चौथ्या मानांकित मेधा कोत्राला ११-४, ११-७, ११-५ असे पराभूत केले. सई कुलकर्णीने दुसऱ्या मानांकित  जान्हवी फणसेचा ५-११, ११-९, ११-४, १०-१२, ११-९ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम

उदय भालचंद्र यांच्या हस्ते उद्घाटन
याआधी स्पर्धेचे उद्घाटन बालुफ ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय भालचंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, आशिष बोडस, स्पर्धेच्या संयुक्त संयोजन सचिव आश्लेषा बोडस, श्रीकांत अंतुरकर, सुरेंद्र देशपांडे, मोहन उसगावकर, मनिषा बोडस, नितीश गोडबोले, चोला मंडलम फायनान्सचे अमित कुमार, गुरु राघवेंद्र नाडगौडा, दिपेश अभ्यंकर आणि मुख्य पंच मधुकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Harish salvi pune wins the dr pramod mule memorial trophy table tennis tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.