Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports Competition: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली ‘कांस्य पदकाची’ कमाई

हरिवंशला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकणारा शिवा या खेळाडूचे 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक निश्चित मानले जात होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2025 | 07:25 PM
38th National Sports Competition: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली 'कांस्य पदकाची' कमाई

38th National Sports Competition: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली 'कांस्य पदकाची' कमाई

Follow Us
Follow Us:

पितोडगड: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीला 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंचा उपांत्य फेरीपूर्वीच पराभव झाल्याने मुष्टीयुद्धातील महाराष्ट्राचे हे एकमेव पदक ठरले आहे. 60 ते 63.5 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत ऑलिंपिकमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणार्‍या शिवा थापाला महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीने शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली.

हरिवंशला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर अनेक पदके जिंकणारा शिवा या खेळाडूचे 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक निश्चित मानले जात होते त्यामुळेच त्याच्याविरुद्ध खेळताना हरिवंश याला फारशी संधी नव्हती. तरीही हरिवंश याने तीनही फेर्‍यांमध्ये शिवा याला कौतुकास्पद झुंज दिली. हरिवंश याने ही लढत गमावली तरीही प्रेक्षकांनी त्याच्या जिद्दीचे मनापासून कौतुक केले.

अकोला येथील खेळाडू हरिवंश याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. त्याने यापूर्वी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा कांस्यपदक तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत एक कांस्यपदक जिंकले होते 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. 2021-22 चा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे तो सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य, तर सायकलिंगमध्ये दुहेरी धमाका

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाउंड राउंड महिलामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रितिका प्रदीप आणि पुर्वशा शेंडे यांच्या संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.

डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्णपदकाची लढत डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी (सातारा), मधुरा धामणगावकर आणि प्रितिका प्रदीप (पिंपरी चिंचवड) आणि पुर्वशा शेंडे (अमरावती) या महिला संघाने सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र, दोन वेळा मिळालेले ८ गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा: 38th National Sports Championship : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य, तर सायकलिंगमध्ये दुहेरी धमाका

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी आणि पूजा दानोळी यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे ३२.६४३ सेकंदात पार केली. हरियाणा (पाच मिनिटे २६.९२० सेकंद) आणि ओडिशा (पाच मिनिटे ३०.४२३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन’ सायकलिंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले‌.

 

Web Title: Hariwansh tiwari won bronze medal at boxing 38 th national sports competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • 38th India National Games
  • maharashtra
  • Sports News

संबंधित बातम्या

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
1

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
2

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
3

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी
4

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.