
ind w vs pak w
आजपासून दुबईत सुरू झाली महिला आशिया कप स्पर्धा
5 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान येणार आमनेसामने
कर्णधार हरमनप्रीत कौरची प्रतिक्रिया आली समोर
India Women’s Vs Pakistan Women’s/ Asia Cup 2026: आजपासून दुबई येथे महिला टी 20 आशिया कप 2026 या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 8 महिला क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहेत. भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. आज पहिला सामना थायलंड आणि हाँगकोंग यांच्यात होणार आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या आधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महिला आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता सर चाहत्यांना आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 5 सप्टेंबर रोजी भिडणार आहेत. एकूण ८ संघ विजेतेपदासाठी रिंगणात उतरले असून भारतीय महिला क्रिकेट संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
आज आशिया कप स्पर्धा सुरू होण्याच्या आधी सर्व कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. यावर्षी भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार हरमनप्रीत कौरला पाकिस्तानच्या सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करणार की नाही याबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला.
Women’s Asia Cup 2026: आजपासून महिला आशिया कपची सुरूवात, कधी आणि कुठे होणार Live Match
पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडू सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने या वादावर किंवा प्रश्नावर कोणतेही थेट उत्तर न देता उत्तर देणे टाळले. भारतीय संघ केवळ खेळावर लक्ष केंद्रित करेल असे तिने उत्तर दिल्याचे समोर येत आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही एका विशिष्ट संघावर किंवा सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्वच आशियाई संघांमध्ये गेल्या २-३ वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. आमचे मुख्य ध्येय मैदानावर उत्कृष्ट क्रिकेट खेळणे हेच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिली आहे.
गेल्या महिला आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा आशिया कपच्या चषकावर नाव कोरण्यासाठी आणि जुन्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात खेळताना दिसणार आहे.