Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला

ACC Women's Asia Cup 2026 team India Reached Dubai: २८ ऑगस्टपासून महिला आशिया २०२६ ची सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया दुबईमध्ये दाखल झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 10:11 AM
ACC Women's Asia Cup 2026

ACC Women's Asia Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपसाठी टीम इंडिया दुबईत दाखल
  • पाकिस्तानला धूळ चारण्यास सज्ज
  • भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध
एसीसी महिला आशिया कपसाठी ( ACC Womens Asia Cup 2026) भारतीय संघ सज्ज आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ २०२६ च्या महिला आशिया कपसाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई येथे पोहोचला आहे. २८ ऑगस्टपासून आशिया कप २०२६ स्पर्धेला सुरूवात होईल. बीसीसीआयने महिला खेळाडूंच्या दुबईत पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बीसीसीआयने लिहिले की, हॅलो दुबई! भारतीय संघ २०२६ च्या महिला आशिया कपसाठी पोहोचला आहे.

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

आशिया कपसाठी भारत सज्ज

आशिया कप स्पर्धेत भारत हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे, पण यावेळी त्यांच्यासमोर आपल्या मागील पराभवाचा बदला घेण्याचे आव्हानही असेल. २०२४ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या मागील स्पर्धेत श्रीलंकेने भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. आता, हरमनप्रीतचा संघ पुन्हा एकदा आशियाई विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल.

भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध

आशिया कप २०२६ स्पर्धेत एकूण आठ संघ आहेत. त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. भारताला पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँगसोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. तर, गतविजेत्या श्रीलंकेला बांग्लादेश, इंडोनेशिया आणि यजमान युएईसोबत ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दुसरा सामना ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध होईल. त्यानंतर गट फेरीतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल . आयसीसी महिला टी२० चषक २०२६ नंतर या दोन संघांमधील ही पहिलीच भेट असेल.

अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने १० आणि ११ सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. महिला टी२० आशिया कप प्रथमच दुबईमध्ये आयोजित केला जात असून, सर्व १५ सामने याच शहरात खेळले जातील. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच स्पर्धांमध्ये भारताने तीन टी२० आशिया कप विजेतेपदे पटकावली आहेत.

एसीसी महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकुर, नंदिनी शर्मा, क्रांति गौड, प्रतिका रावल.

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

Web Title: Acc womens asia cup 2026 team india reached dubai harmanpreet kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Dubai
  • Indian Women Cricket Team
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
1

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
2

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
3

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
4

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.