Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोठे वक्तव्य

Harmanpreet kaur On Ind vs pak Handshake Row Question: आज महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होटेज सामना रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का या प्रश्नावर कर्णदार हरमनप्रीतने सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 12:20 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार?
  • हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
  • नो हँडशेक ट्रेंड सुरू राहणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला विश्वचषक स्पर्धेतील ( ICC Women’s T20 World Cup 2026) ६ वा सामना खेळला जाणार आहे. हा हायव्होटेज सामना इंग्लंडमधील एड्जबॅस्टन बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला जेव्हा विचारण्यात आले की, टीम इंडिया पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? यावेळी तिने हँडशेकवरुन सुरू असलेल्या वादावर भाष्य करणे टाळले. तिने स्पष्ट केले की भारतीय संघाचे लक्ष पूर्णपणे क्रिकेट आणि सामन्यावर केंद्रित आहे.

IND W vs PAK W: इंग्लंडच्या मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार; हायव्होल्टेज सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकातील भारत- पाकिस्तान, सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत जेव्हा भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला हस्तांदोलन न करण्याच्या धोरणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर देण्याऐवजी, संघाचे लक्ष फक्त खेळावर असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘मला वाटते की आम्ही इथे फक्त क्रिकेट खेळायला आलो आहोत आणि आम्ही फक्त क्रिकेटबद्दलच बोलू. आम्ही क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मी सुद्धा क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही विषयाचा विचार करत नाही. ती पुढे म्हणाली की, एक फॅन्स म्हणून भारत-पाकिस्तान सामने पाहतानाही तिला दडपण जाणवत असे आणि आता तर तिला त्याहूनही जास्त दडपण जाणवते. पण हा केवळ एक खेळ आहे, असे सांगून ती आपल्या सहकाऱ्यांना त्याचा आनंद घेण्यास सांगते.’

भारतीय संघावर दबाव असेल का?

कर्णधार हरमनप्रीत कौरनेही भारत-पाकिस्तान सामन्यातील दबाव असल्याचे मान्य केले. हरमनप्रीत म्हणाली की, जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो, तेव्हा दबाव असणे स्वाभाविक आहे. कर्णधाराने पुढे सांगितले की, भारतीय संघ हा सामना इतर कोणत्याही सामन्याप्रमाणेच खेळेल आणि आपले १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल.

हँडशेक ट्रेंड सुरू राहणार?

२०२५ च्या आशिया कप दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक कतरण्यास नकार दिला. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे आणि या वर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक केले नाही. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हरमनप्रीत कौरनेही पाकिस्तानच्या फातिमा सनाशी हँडशेक केले नव्हते.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी २०२५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता, तिचा संघ आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करत, सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे ध्येय ठेवेल.

IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

Web Title: Harmanpreet kaur on india pakistan handshake controversy ind w vs pak w icc womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs PAK Women

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.