Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harmanpreet Kaur चा मैदानात राडा! कर्णधारपद सोडल्यानंतर ठोकलं खणखणीत शतक; मिताली राजचा विक्रम मोडला

Harmanpreet Kaur Breaks Mithali raj Most Centuries ODI record: भारतीय महिला संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले. यसोबत तिने मिताली राजला मागे टाकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 06:53 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीत कौरचा शतकी धमाका
  • मिताली राजचा विक्रम मोडत रचला इतिहास
  • वनडे शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानी
Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मायदेशात झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे . दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने १९ धावांवर २ विकेट्स गमावले. येथून फलंदाजीला आलेली माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने एका टोकाकडून केवळ डाव सावरला नाही, तर एक शानदार शतकी खेळीही केली. यासह, तिने माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडला आहे. आता महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान

हरमनप्रीतने मिताली राजला टाकलं मागे

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण तिने दुसऱ्या सामन्यात अवघ्या १०१ चेंडूंमध्ये आपले ८ वे एकदिवसीय शतक झळकावून त्याची भरपाई केली. हरमनप्रीत कौरने १५ चौकारांसह १२१ चेंडूंमध्ये १२६ धावांची ही शानदार खेळी केली. आता, महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिच्या पुढे फक्त भारताची नवीन कर्णधार स्मृती मंधाना आहे. तिने १४ शतके झळकावली आहेत.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके

  • स्मृती मानधना – १४ शतक
  • हरमनप्रीत कौर – ८ शतक
  • मिताली राज – ७ शतक
  • पूनम राऊत – ३ शतक
  • जेमिमा रॉड्रिग्ज – ३ शतक
  • प्रतिका रावल – ३ शतक

हरमनप्रीत कौर शतक झळकावणारी चौथी सर्वात वयस्कर खेळाडू

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरने शतक पूर्ण करताच ती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी चौथी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली. हरमनप्रीतने वयाच्या ३७ वर्षे आणि २३१ दिवसांनी आपले आठवे एकदिवसीय शतक पूर्ण केले. या यादीत अव्वल स्थानी न्यूझीलंड महिला संघाची खेळाडू बार्ब बेब्स आहे. तिने १९८२ मध्ये वयाच्या ३९ वर्षे आणि ४८ दिवसांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे सर्वात वयस्कर खेळाडू

  • बार्ब बेब्स – न्यूझीलंड – ३९ वर्षे ४८ दिवस (१९८२)
  • जेनेट ब्रिटिन – इंग्लंड – ३८ वर्षे १६१ दिवस (१९९७)
  • डेलिन टेरब्लँच – दक्षिण आफ्रिका – ३७ वर्षे २८९ दिवस (२०००)
  • हरमनप्रीत कौर – भारत – ३७ वर्षे २३१ दिवस (२०२६)
  • डेबोरा हॉकले – न्यूझीलंड – ३७ वर्षे ९१ दिवस (२०००)
IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

Web Title: Harmanpreet kaur hit century against zimbabwe breaks mithali raj odi most century record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS ZIM
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान
1

IND W vs ZIM W Live: भारताच्या वाघिणींची डरकाळी! हरमनप्रीत-दिप्तीचा वादळी शतकी धमाका; झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचं आव्हान

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर
2

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका
3

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर
4

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.