Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये विजय मिळवला. ओडिशाकडून लुगान अंजुलता (२४वे मिनिट) हिने गोल करत आघाडी मिळवून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 03:41 PM
Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम
Follow Us
Follow Us:

हरियाणा, छत्तीसगडची दणक्यात उपांत्य फेरीत धडक
हॉकी झारखंड, मध्य प्रदेशही उपांत्य फेरीत
नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू आहे हॉकी इंडिया स्पर्धा 

पुणे: १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या (Pune Sports) उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये चारही संघांनी दमदार कामगिरी केली.

गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात केली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी मध्य प्रदेशने मणिपूर हॉकीचा ३-१ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी चंदीगडवर ३-१ अशी मात केली, तर तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात छत्तीसगड हॉकीने उत्तर प्रदेश हॉकीचा ५-२ असा पराभव केला. क्रवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात हॉकी झारखंडचा सामना हॉकी मध्य प्रदेशशी, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात हॉकी हरियाणाची गाठ छत्तीसगड हॉकीशी पडणार आहे.

ही अजिंक्यपद स्पर्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हॉकी महाराष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक ही प्रस्तुत प्रायोजक असून, युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर अस्वानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला हे सपोर्ट पार्टनर्स आहेत.

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का

शूटआऊटपर्यंत रंगला सामना

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर शूटआऊटमध्ये विजय मिळवला. ओडिशाकडून लुगान अंजुलता (२४वे मिनिट) हिने गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हॉकी झारखंडच्या राजणी केरकेट्टा (३३वे मिनिट) हिने गोल करत सामना बरोबरीत आणला. शूटआऊटमध्ये हॉकी झारखंडकडून सलोमी नाग, अनुप्रिया सोरेंग, डुंगडुंग स्विती आणि राजणी केरकेट्टा यांनी गोल केले. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाकडून द्रुपती नाईक, आमद आशिका आणि अजिता एक्का यांनी गोल नोंदवले. हॉकी झारखंडची जमुना कुमारी, तर ओडिशाची अटलाया लकडा आणि भोई डोली यांना शूटआऊटमध्ये गोल करण्यात प्रयत्न निष्फळ ठरला.

काजलचे शानदार २ गोल

यानंतर झालेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी मध्य प्रदेशने मणिपूर हॉकीचे आव्हान ३-१ असे संपुष्टात आणले. मध्य प्रदेशकडून काजलने (२५ वे, ४३ वे मिनिट) दोन गोल करत शानदार कामगिरी केली. यातील पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवरून, तर दुसरा मैदानी गोल होता. तन्वी (३७वे मिनिट) हिने पेनल्टी कॉर्नरवरून आणखी एक गोल करत मध्य प्रदेशची आघाडी भक्कम केली. मणिपूरकडून चानू रोमिता वारिबाम (४४वे मिनिट) हिने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत पिछाडी कमी केली.

एकतर्फी सामन्यात हरयाणाची बाजी

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी चंदीगडला ३-१ असे पराभूत केले. दुर्गा (१४वे मिनिट), दीक्षा (१९वे मिनिट) आणि सुखप्रीत कौर (५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत हरियाणाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. हॉकी चंदीगडकडून अप्राम (३९वे मिनिट) हिने एकमेव गोल नोंदवला.

छत्तीसगडचा वेगवान खेळ

तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात छत्तीसगड हॉकीने उत्तर प्रदेश हॉकीवर ५-२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. विजेत्या संघाकडून यशोदा (९वे, ३७वे मिनिट), रुखमणी (१९वे मिनिट), अंजली एक्का (२४वे मिनिट) आणि यादव शीतल (४४वे मिनिट) यांनी गोल केले. उत्तर प्रदेश हॉकीकडून शंकर पायल (२२वे मिनिट) आणि अन्नू (३३वे मिनिट) यांनी गोल नोंदवले.

रणधुमाळी Hokcey स्पर्धेची! पुण्यनगरीत रंगला थरार; झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात अन्…

उपांत्यपूर्व फेरी 

उपांत्यपूर्व सामना १:
हॉकी झारखंड : १ (४) – राजणी केरकेट्टा (३३वे मिनिट); सलोमी नाग, अनुप्रिया सोरेंग, डुंगडुंग स्विती, राजणी केरकेट्टा वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा : १ (३) – लुगान अंजुलता (२४वे मिनिट); द्रुपती नाईक, आमद आशिका, अजिता एक्का; मध्यंतर: ०-१

उपांत्यपूर्व सामना २

हॉकी हरियाणा : ३ – दुर्गा (१४वे मिनिट), दीक्षा (१९वे मिनिट), सुखप्रीत कौर (५९वे मिनिट)
वि. हॉकी चंदीगड : १ – अप्राम (३९वे मिनिट); मध्यांतर : २-०

उपांत्यपूर्व सामना ३:

छत्तीसगड हॉकी : ५ – यशोदा (९वे, ३७वे मिनिट), रुखमणी (१९वे मिनिट), अंजली एक्का (२४वे मिनिट), यादव शीतल (४४वे मिनिट) वि. उत्तर प्रदेश हॉकी : २ – शंकर पायल (२२वे मिनिट), अन्नू (३३वे मिनिट); मध्यांतर : ३-१

Web Title: Haryana and chhattisgarh storm into semi finals of hockey india junior womens national championship pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Hockey
  • Pimpri
  • Sports News

संबंधित बातम्या

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
1

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
2

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
4

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.