Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोच म्हणून आले, पण अवघ्या ६ महिन्यांतच पद सोडलं! ‘या’ दिग्गजाने उघड पाडलं Pakistani Cricket चं वास्तव

पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे पाकिस्तानी संघातील अंतर्गत वातावरणामुळे चर्चेत आलं आहे. दिग्गजांनी नुकताच पाकिस्तानी संघाचं वास्तव उघडं पाडलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 21, 2026 | 03:26 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी क्रिकेटबाबत धक्कादायक खुलासे
  • अंतर्गत कलह चव्हाट्यावर
  • सतत होत असलेला बाह्य हस्तक्षेप
The harsh reality of Pakistani cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्यांच्या खेळाडूंच्या वर्तवणूकमुळे तर कधी त्यांच्या मॅनेजमेंटमुळे चर्चेत असतात. आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे पाकिस्तानी संघातील अंतर्गत वातावरणामुळे चर्चेत आलं आहे. दिग्गजांनी नुकताच पाकिस्तानी संघाचं वास्तव उघडं पाडलं आहे.

RCB विजेतेपदाचा प्रमुख दावेदार, ‘पुढच्या 2 वर्षांत आणखी 2 ट्रॉफी!’, CSK च्या माजी खेळाडूचं विधान

पाकिस्तानी क्रिकेटबाबत धक्कादायक खुलासे

गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. गॅरी कर्स्टन सध्या श्रीलंकेच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्स्टन यांनी काही महिन्यांसाठी पाकिस्तानच्या ‘व्हाइट-बॉल’ संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते. त्यांनी पाकिस्तान क्रिकेटबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी संघासोबतच्या त्याच्या अल्पकालावधीतील कार्यकाळाबाबतचं वर्णन करताना त्याने उघड केलं की, संघातील अंतर्गत वातावरण इतकं विस्कळीत होतं की, त्याला आपलं काम करणे जवळजवळ अशक्य झाले होते.

अंतर्गत कलह चव्हाट्यावर

गॅरी कर्स्टनच्या या खुलाशांमुळे पाकिस्तानी संघातील अंतर्गत कलह आणि गोंधळाची स्थिती चव्हाट्यावर आली आहे. २०२४ मध्ये पाकिस्तानचा ‘व्हाइट-बॉल’ प्रशिक्षक म्हणजेच मर्यादित षटकांचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या कर्स्टनला अवघ्या सहा महिन्यांतच आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्याने स्पष्ट केले की, संघाच्या कामकाजात बाह्य हस्तक्षेप इतका जास्त होता की, एखाद्या प्रशिक्षकाला आपली रणनीती अंमलात आणणं अक्षरशः अशक्य बनलं होतं.

सतत होत असलेला बाह्य हस्तक्षेप

एका माध्यमाशी बोलताना गॅरी कर्स्टन म्हणाला, “माझ्यासाठी सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे सतत होत असलेला बाह्य हस्तक्षेप. यामुळे एखाद्या प्रशिक्षकाला संघासोबत प्रभावीपणे काम करणे अत्यंत कठीण जाते.” कर्स्टनने पुढे सांगितले की, जेव्हा संघाची कामगिरी खराब व्हायची, तेव्हा संघातील वातावरण आणखीच तणावपूर्ण व्हायचं. कर्स्टनच्या मते, पाकिस्तान क्रिकेटमध्ये खराब कामगिरीचं खापर नेहमीच सर्वप्रथम प्रशिक्षकाच्या माथी फोडलं जायचं.

‘प्रशिक्षक सोपं लक्ष्य’

गॅरी कर्स्टनने टिप्पणी केली, “बाहेरून सतत टीका आणि गोंधळ सुरू असायचा आणि खराब कामगिरीचे गंभीर परिणाम भोगावे लागायचे. अशा वातावरणात, जबाबदारी नेहमीच सर्वप्रथम प्रशिक्षकावरच लादली जायची.” त्याने पुढे मान्य केले की, जेव्हा जेव्हा संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा प्रशिक्षक हे सर्वात सोपे लक्ष्य ठरतात.

सुरुवातीला नियुक्त तरी का केलं?

उपहासात्मक सुरात गॅरी कर्स्टन यांनी पुढे सांगितलं की, “जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नसतो, तेव्हा सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रशिक्षकाला काढून टाकणं किंवा त्याच्यावर निर्बंध घालणं हा असतो. मात्र, माझ्या मते, हा दृष्टिकोनच मुळात सदोष आहे. जर तुमचा प्रशिक्षकावर विश्वासच नसेल, तर मग त्याला सुरुवातीला नियुक्त तरी का केलं?”

पडद्याआड राहून कटकारस्थाने

गॅरी कर्स्टनच्या जाण्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यानेही डिसेंबर २०२४ मध्ये पाकिस्तानी कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेद याच्यावर आरोप करताना गिलेस्पीने म्हटले की, प्रशिक्षकपद स्वतःकडे मिळवण्यासाठी आकिब पडद्याआड राहून कटकारस्थाने रचत होता. सततचे वादविवाद, प्रशिक्षकांचे राजीनामे आणि अंतर्गत गटबाजी यामुळे पाकिस्तान क्रिकेट सध्या एका गंभीर संकटातून जात आहे. गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांसारख्या मोठ्या नावांनी केलेल्या खुलाशांमुळे, संघाच्या आतमध्ये सर्व काही आलबेल नाही, ही वस्तुस्थिती आणखीच स्पष्ट झाली आहे.

‘इम्पॅक्ट प्लेयर’, मेंटर की …! CSK टीममध्ये MS Dhoni ची भूमिका काय असेल? Sanju Samson च्या एन्ट्रीने बदलली समीकरणं?

Web Title: He arrived as a coach but stepped down from the post in just six months this legend exposed the harsh reality of pakistani cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • cricket
  • cricket marathi news
  • Mahendra Singh Dhoni

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
3

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
4

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.