
पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची काहीशी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, एफसी रस्ता या परिसरात पावसाने हजेरी लावली.
कात्रज, धनकवडी, लोहगाव, पेठ भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून शहरात ढगाळ हवामान पाहायला मिळत होते. मात्र पाऊस येणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले.