Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 07:17 PM
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी

Follow Us
Follow Us:
  • मान्सून पुढील ४८ तासांत महाराष्ट्र व्यापणार
  • राज्यात पावसासाठी पोषक वातावरण
  • काल पुणे शहरात पावसाने लावली हजेरी 
सुनयना सोनवणे/पुणे: गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने अखेर महाराष्ट्रातील वाटचाल पुन्हा सुरू केली असून सोमवारी (ता. २२) मान्सूनने रायगडमधील अलिबाग आणि पुण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळे पुणेकरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा काही भाग, महाराष्ट्रातील अलिबाग व पुण्यासह आणखी काही क्षेत्रे तसेच तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील काही भाग व्यापले. सध्या मान्सूनची उत्तर सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगड, छत्रा, गया आणि मुझफ्फरपूर येथून जात आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहण्याचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे कोकण-गोव्यातील सर्व जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता.२२) कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसने घट होऊन ते ३३ अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस होते. दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवास आले. मंगळवारी (ता.२३) कमाल तापमान स्थिर राहण्याची, तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे तापमानात आणखी घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Imd gave heavy rain yellow aret to kokan and all maharashtra next 2 days latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
1

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले
2

आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू
3

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
4

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.