Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey U-18 Asia Cup: भले शाब्बास! भारताने पाकिस्तानला लोळवलं! हॉकीच्या मैदानावर मारली फायनलमध्ये धडक

पाकिस्तानच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत अभेद्य भिंतीसारख्या डिफेन्ससमोर त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अंतिम शिट्टी वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 09:31 PM
Hockey U-18 Asia Cup: भले शाब्बास! भारताने पाकिस्तानला लोळवलं! हॉकीच्या मैदानावर मारली फायनलमध्ये धडक

Hockey U-18 Asia Cup: भले शाब्बास! भारताने पाकिस्तानला लोळवलं! हॉकीच्या मैदानावर मारली फायनलमध्ये धडक

Follow Us
Follow Us:

अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत पाकिस्तान आमनेसामने
पाकिस्तानवर भारतीय संघाने मिळवला शानदार विजय
अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत भारत जपान भिडणार

IND vs PAK Hockey Updates: अंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत आज भारत (Indian Hockey Team) आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला पार पडला. आशियाई पुरुष हॉकी स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी फायनलमध्ये भारताची लढत जपानविरुद्ध होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हॉकी सेमीफायनल पार पडली. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर दबाव ठेवला होता. भारतीय संघाने पाकिस्तानच्या बचाव फळीला खिंडार पाडले. सामन्याचा मध्यांतर होईपर्यंत भारताने या खेळावर पकड मिळवली होती.

Hockey U-18 Asia Cup: कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हायव्होल्टेज लढत; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?

पाकिस्तानच्या खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत अभेद्य भिंतीसारख्या डिफेन्ससमोर त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अंतिम शिट्टी वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही आणि हॉकीच्या मैदानावर पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.

𝐈𝐍 𝐂𝐀𝐒𝐄 𝐘𝐎𝐔 𝐌𝐈𝐒𝐒𝐄𝐃 𝐈𝐓… 👀🇮🇳#HockeyIndia #IndiaKaGame #U18AsiaCup2026 @imsardarsingh8 pic.twitter.com/ibc8gO6g7y — Hockey India (@TheHockeyIndia) June 5, 2026

भारतीय संघाने हॉकीच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता अंतिम सामन्यात भारतासमोर जपानचे तगडे आव्हान असणार आहे. जपानने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सध्या ज्या फॉर्मात आहे, ते पाहता टीम इंडिया सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क

भारताची विजयी घोडदौड

भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात कझाकिस्तानवर १३-० अशा दणदणीत विजयाने केली. त्यानंतर जपानविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला, मात्र त्या पराभवातून धडा घेत संघाने शानदार पुनरागमन केले. कोरियाला ४-१ ने नमवल्यानंतर भारतीय संघाने चायनीज तायपेईचा १३-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत ३२ गोल केले असून केवळ ६ गोल स्वीकारले आहेत.

Web Title: Hockey u 18 asia cup indian team beat pakistan 5 3 points enter in final against japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • Hockey World Cup 2026
  • Indian hockey team
  • PAK vs IND

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.