फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : T-२० विश्वचषकाचा आज महामुकाबला काही तासातच सुरु होणार आहे. रोहित सहर्मच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने साखळी सामन्यांमध्ये ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. सुपर-८ मधील टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताने ३ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यत विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही अपराजित संघांमध्ये होणार आहे. हे दोन्ही संघ मजबूत संघ आहेत.
T२० विश्वचषक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि वर्ल्डकपचा फायनलचा सामना शिल्लक आहे. हा सामना २९ जून रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. या निर्णायक सामन्यात भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. दोन्ही संघ आतापर्यत अपराजित राहिले आहेत त्यामुळे दोन्ही संघांपैकी एका संघाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या संघाने २००७ मध्ये T२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अजुनपर्यत एकदाही T-20 विश्वचषक जिंकलेला नाही.
आजचा हा महामुकाबला केव्हा आणि कुठे खेळला जाईल हे जाणून घेऊया. चाहते त्याचे थेट प्रसारण आणि थेट प्रवाह कसे पाहू शकतात? यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा फायनलचा सामना २९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे आयोजन बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर करण्यात आले आहे. हा सामान भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल आणि सामन्याचे नाणेफेक अर्ध्या तासाआधी होईल.
T२० विश्वचषक २०२४ चे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनलवर फायनलचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सामन्याचे थेट प्रवाह Disney+Hotstar वर उपलब्ध आहे. त्याचबरोबर नवराष्ट्रवर तुम्हाला या सामन्याचे क्षणोक्षणी अपडेट्स मिळू शकतात.