काय असणार 2027 वर्ल्डकप साठी भारतीय संघ? (फोटो- ai gemini)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी 227 मधील आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचा १५ सदस्यांचा संभाव्य भारतीय संघ जाहीर केला आहे. गावस्करांच्या या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा सुरेख मेळ पाहायला मिळत असला, तरी काही मोठ्या खेळाडूंना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि चेस मास्टर विराट कोहलीवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. शुभमन गिल कर्णधार म्हणून त्यांनी निवडला आहे. सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी त्यांची पहिली पसंती ठरली आहे. याशिवाय मध्यफळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ईशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. मात्र युवा खेळाडूंमध्ये त्यांनी ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनला संधी दिलेली नाहीये. त्यांनी अनुभवी खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवला आहे.
कोणाला स्थान दिले नाही?
सुनील गावस्कर यांनी अनेक खेळाडूंना वर्ल्डकपच्या संघात स्थान दिलेले नाही. त्यामध्ये यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार यांना संधी गावस्कर यांनी दिली नाही. यशस्वीन सर्व फॉर्मटमध्ये चांगले प्रदर्शन केले असले तरी गावस्कर यांनी त्याला का स्थान दिले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
सुनील गावस्करांचा १५ सदस्यांचा वर्ल्ड कप संघ
भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, कुलदीप यादव.
WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…






