भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेटने केला पराभव (Photo Credit - X)
दक्षिण आफ्रिका ११७ धावांवर गारद
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ११७ धावांवर गारद झाला. कर्णधार एडेन मार्कराम (४६ चेंडूत ६१ धावा, सहा चौकार, दोन षटकार) वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. क्विंटन डी कॉक (१) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (२) यांच्यासह सात खेळाडूंना दुहेरी आकडी धावा करता आल्या नाहीत. सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला आपले खाते उघडता आले नाही. डोनोव्हन फरेरा यांनी २० धावा आणि अॅनरिच नोर्किया यांनी १२ धावा दिल्या.
धर्मशाळामध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर
अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचा वरचा क्रम उध्वस्त केला. मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्तीने आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रास दिला आणि चार षटकांमध्ये फक्त ११ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. चक्रवर्ती टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज बनला. या यादीत त्याच्या पुढे फक्त कुलदीप यादव, अजंता मेंडिस आणि वानिंदू हसरंगा आहेत. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर चक्रवर्ती आणि कुलदीप यांनीही दोन विकेट्स घेतल्या. ‘बर्थडे बॉय’ कुलदीप यादवने सामन्यात फक्त दोन षटके टाकली आणि दोन विकेट्स घेतल्या.
भारताची बेधडक फलंदाजी
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने बेधडक सुरुवात केली. अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूत षटकार लगावला. तर शुभमन गिलने ही त्याला चांगली साथ दिली. अभिषेक शर्माने ४ चौकार ३ षटकार मारून ३५ धावा करुन बाद झाला. तसेच गिलने २८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने १२ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने डाव सांभळला आणि भारताला १५.५ षटकात विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशला एक विकेट मिळाली. आता मालिकेतील चौथा टी-२० सामना लखनौ येथे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर १७ डिंसेबरला खेळवला जाणार आहे.






