Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC चे नियम बदलणार! 17 जूनपासून कसोटी, 2 जुलैपासून एकदिवसीय आणि 10 जुलैपासून T20 सामन्यांमध्ये हे नियम बदलतील… वाचा सविस्तर

आयसीसी पुरुष समितीने जारी केलेले बदल कसोटी सामन्यात १७ जून, एकदिवसीय सामन्यात २ जुलै आणि टी२० सामन्यात १० जुलैपासून लागू होणार आहेत अशी माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 15, 2025 | 09:59 AM
फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

Follow Us
Close
Follow Us:

आयसीसीच्या नियमांमध्ये होणार बदल : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना काल संपला आहे, यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आहे. आयसीसीने पुरुष क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्स – एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० इंटरनॅशनलच्या खेळण्याच्या परिस्थितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमध्ये कन्कशन सब्स्टिट्यूटपासून ते एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्यापर्यंतचे नियम अपडेट करणे समाविष्ट आहे. आयसीसी पुरुष समितीने जारी केलेले बदल कसोटी सामन्यात १७ जून, एकदिवसीय सामन्यात २ जुलै आणि टी२० सामन्यात १० जुलैपासून लागू होणार आहेत अशी माहिती दिली आहे.

आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्यात येत होते, दोन्ही टोकांवरून २५-२५ षटकांसाठी एक नवीन चेंडू वापरला जात होता, ज्यामध्ये आता थोडा बदल दिसून येणार आहे. याचा फायदा गोलंदाजांना होणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये हे नियम कधी बदलतील याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेचा संघ चॅम्पियन झाल्यानंतर केशव महाराजच्या डोळ्यात अश्रू! म्हणाला – मी खूप भाग्यवान…. 

या नियमांमध्ये बदल करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हे सुधारित नियम १७ जूनपासून कसोटी, २ जुलैपासून एकदिवसीय आणि १० जुलैपासून टी-२० स्वरूपात लागू केले जातील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही २ नवीन चेंडू वापरले जातील, परंतु ते २५ व्या षटकापर्यंत नव्हे तर ३४ व्या षटकापर्यंत वापरले जातील. याशिवाय, दोन्ही संघांना ३५ ते ५० षटकांपर्यंत गोलंदाजी सुरू ठेवण्यासाठी त्या २ चेंडूंपैकी एक निवडावा लागेल. तर जर सामना ५० ओव्हरवरून २५ ओव्हरपर्यंत कमी केला गेला तर फक्त एकच चेंडू वापरला जाणार आहे.

अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी

आतापर्यंतच्या नियमांनुसार, गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये चेंडू उलटवणे खूप कठीण होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये खूप मोठे धावसंख्या पाहायला मिळत होती, परंतु आता गोलंदाजांची चिंता दूर करण्यासाठी आयसीसीने हा नियम बदलला आहे, ज्यामुळे गोलंदाजांना खूप मदत होणार आहे.

आता कर्णधारांना नाणेफेकीपूर्वी त्यांच्या ५ कन्कशन सबस्टिट्यूट खेळाडूंची नावे द्यावी लागणार आहेत. आतापर्यंत असे नव्हते आणि सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून खेळू शकत होता. आता कर्णधारांना या ५ खेळाडूंमधून एक फलंदाज, एक ऑलराउंडर, एक विकेटकीपर, एक स्पिनर आणि एक वेगवान गोलंदाज निवडावा लागेल.

 

Web Title: Icc rules to change these rules will change in tests odis and t20 matches read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • cricket
  • ICC
  • Sports

संबंधित बातम्या

मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियामध्ये फूस्स…4 BBL सामन्यांमध्ये ठरला अपयशी! आकडेवारी फारच खराब
1

मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियामध्ये फूस्स…4 BBL सामन्यांमध्ये ठरला अपयशी! आकडेवारी फारच खराब

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप
2

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझावर कोसळला दु:खाचा डोंगर! 13 वर्षांच्या भावाच्या झाले निधन
3

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझावर कोसळला दु:खाचा डोंगर! 13 वर्षांच्या भावाच्या झाले निधन

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार
4

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.