Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

IND A vs NZ A Mukesh Kumar 5-wicket haul Siraj 4: न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात मुकेश कुमारने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनेही आपल्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडला गारद केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 06:17 PM
Mukesh Kumar 5-wicket haul Siraj

Mukesh Kumar 5-wicket haul Siraj

Follow Us
Follow Us:
  • मुकेश कुमारने गाजवले मैदान
  • ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला दिले मोठे धक्के
  • न्यूझीलंड A चा पहिला डाव ४२४ धावांवर आटोपला
Mukesh Kumar mohammed Siraj: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात दुसरा अनधिकृत कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड ‘अ’ संघ पहिल्या डावात ४२४ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने भारत संघावर ७४ धावांची आघाडी घेतली. दरम्यान मॅथ्यू बॉईलने शतक झळकावले, तर डीन फॉक्सक्रॉफ्टचे शतक सात धावांनी हुकले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मुकेश कुमारने पाच विकेट्स घेतले, तर मोहम्मद सिराजने चार विकेट्स घेतले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ३२ धावा केल्या होत्या. (IND A vs NZ A)

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

मुकेश कुमारचा पंच, न्यूझीलंडचे ५ फलंदाज गारद

भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यात मुकेश कुमारने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने २९ षटकांत केवळ ८७ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. मुकेशने आपल्या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये ९ मेडन षटके टाकली. त्याने धोकादायक फलंदाज ख्रिश्चन क्लार्क, फ्रेझर शीट्स आणि मिचेल हे यांचेही विकेट्स घेतले. मुकेश न्यूझीलंडच्या परिस्थितीत शानदार गोलंदाजी करत आहे.

मोहम्मद सिराजनेही दाखवला दम

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही जबरदस्त गोलंदाजी केली. न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ३५ षटके गोलंदाजी करत ११८ धावांत ४ विकेट्स घेतले. दरम्यान, त्याचा इकॉनॉमी रेट ३.३७ होता आणि त्याने ८ मेडन षटके टाकली. सिराज भारतीय कसोटी संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि कसोटी मालिकेपूर्वी त्याने पुन्हा फॉर्ममध्ये येणे हे भारतीय संघासाठी एक चांगले लक्षण आहे.

मुकेश कुमारला भारतीय कसोटी संघात संधी मिळणार?

दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रसिद्धला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. परंतु, एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटी मालिकेपूर्वी प्रसिद्ध कृष्णा पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर त्याच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश केला जाऊ शकतो. मुकेशचा फॉर्म भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मुकेश कुमारने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून, मुकेशने एकूण तीन कसोटी सामने खेळून सात विकेट्स घेतले आहेत.

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?

Web Title: Ind a vs nz a mukesh kumar 5 wickets mohammed siraj 4 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India A Team
  • India Vs New Zealand
  • Mohammed Siraj
  • Mukesh Kumar

संबंधित बातम्या

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
1

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11
2

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?
3

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?
4

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.