
फोटो सौजन्य - Sony Sports Network सोशल मिडिया
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने श्रीलंकेचा पराभव करुन फायनलमध्ये युवा भारतीय संघाने प्रवेश केला आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दोन विकेट लवकर गमावल्यानंतर भारताचा उपकर्णधार विहान मल्होत्रा आणि आरोन जाॅर्ज यांनी खेळी सांभाळली आणि भारताच्या संघाला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. भारताच्या संघाचा पुढील सामना 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील या युवा संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
पहिल्या सामन्यात भारताने युएईचा २३४ धावांनी पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव केला. त्यांच्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा ३१५ धावांनी पराभव केला. त्यानंतर, शुक्रवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये, भारताने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. निर्णायक सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होईल. तर, हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये फायनलचा सामना हा 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे, हा सामना अंडर-१९ यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाणार आहे. आशिया कपचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल आणि टॉस सकाळी १० वाजता होईल.
Where we belong. Chasing the crown. 💪 Watch #INDvPAK in the GRAND FINALE, on Dec 21, 10:30 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #DPWorldMensU19AsiaCup2025 pic.twitter.com/I0W79UVvbX — Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 19, 2025
या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे क्रिकेट चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहु शकतात. त्याचबरोबर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहु शकता.
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, युवराज गोहिल, उद्धव मोहन, नमन हरणपा, नमन पश्चिया, पानश कुमार सिंह.
अली रझा, मोमीन कमर, फरहान युसूफ (कर्णधार), उस्मान खान, अब्दुल सुभान, अहमद हुसैन, अली हसन बलोच, दानियाल अली खान, हमजा जहूर, हुजैफा अहसान, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सय्यम, मोहम्मद शायन, नकाब शफीक, समीर मिन्हास.