फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मिडिया
2025 मध्ये झालेल्या महिला एक दिवसीय विश्वचषकाचे जेतेपद भारतीय महिला संघाने नावावर केले. भारताचे संघाने कमालीची कामगिरी करत शेवटचे सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाला पराभूत करून ट्रॉफी जिंकली आणि इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्यांदा भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये विश्वचषक जिंकून विक्रम नावावर केला आहे. एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतर आता भारतीय संघ लक्ष हे t20 विश्वचषक २०२६ वर असणार आहेत.
पुरुष t20 विश्वचषक झाल्यानंतर भारतीय महिला संघ देखील टी-ट्वेंटी विश्वचषकांसाठी खेळताना दिसणार आहे. आता भारतीय संघाची तयारी सुरू होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच मालिका खेळताना दिसणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना विशाखापटनम् येथे खेळला जाणार आहे. 21 डिसेंबर रोजी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.वाय.एस. विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम थील मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यांच्या अर्ध्यातासाआधी नाणेफेक होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टारवर पाहता येणार आहे. भारतीय महिला संघाची स्फोटक फलंदाज शफाली वर्मा देखील या संघाचा भाग आहे, जिने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी प्रतिका रावलची जागा घेतली होती.
𝗔 𝗻𝗲𝘄 𝗷𝗼𝘂𝗿𝗻𝗲𝘆 𝗯𝗲𝗴𝗶𝗻𝘀! 🇮🇳 Back on field and raring to go, ft. #TeamIndia 💪 P.S. – Don’t miss Vaishnavi Sharma’s special birthday celebration in Vizag 🥳#INDvSL | @IDFCFirstbank pic.twitter.com/aXgLcdlWPO — BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2025
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही पाच सामन्यांची मालिका महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या हंगामापूर्वी आयोजित करण्यात आली आहे. WPL चा आगामी हंगाम ९ जानेवारीपासून नवी मुंबईत सुरू होईल. भारत आणि श्रीलंका यांनी शेवटचा टी-२० सामना ऑक्टोबर २०२४ मध्ये विश्वचषकादरम्यान खेळला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका डिसेंबरमध्ये पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर श्रीलंकेसोबत द्विपक्षीय मालिका नियोजित करण्यात आली होती.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमालिनी (विकेटकीपर), श्री चरणी, वैष्णवी शर्मा






