Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियामध्ये ‘हिटमॅन’ चा ‘बिग’ शो! रोहित शर्माची नव्या विक्रमाला गवसणी; आजवर एकाच….

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शानदार १२१ धावांच्या जोरवार ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या सामन्यात रोहितने एक खास विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 09:30 PM
IND vs AUS 3rd ODI: 'Hitman's' 'Big' show in Australia! Rohit Sharma sets a new record; Only one....

IND vs AUS 3rd ODI: 'Hitman's' 'Big' show in Australia! Rohit Sharma sets a new record; Only one....

Follow Us
Follow Us:

IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शानदार १२१ धावांच्या जोरवार ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला.  रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात आपले वर्चस्व प्रस्थापित करून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना प्रभावित करून सोडले. पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील कमकुवत कामगिरीनंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. सलग दोन अर्धशतके झळकावत रोहितने आपली क्षमता सिद्ध केली.

सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात, हिटमॅनने सुरवातीला देखील संथ पण संयमी खेळी खेळली आणि त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितने १२५ चेंडूत १२१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारले. या खेळीसह त्याने एक विक्रम देखील रचला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक

सचिन तेंडुलकरनंतर रोहित दुसराच फलंदाज

या खेळीदरम्यान, रोहित शर्माने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५०० धावा पूर्ण केल्या, हा पराक्रम करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, फक्त सचिन तेंडुलकरच्या नावे ही कामगिरी जमा होती. ७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित केलेली ही कामगिरी त्याच्या मजबूत आणि सातत्यपूर्ण कामगिरीची साक्ष ठरली आहे. सध्या, सक्रिय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३०७७ धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.  या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव करून मालिकेचा शेवट गोड केला आहे.  टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी  ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात  रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २७३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी सुटली.

रोहित शर्मा आणि विराटची अभेद्य भागीदारी

भारताची पहिली विकेट ६९ धावांवर पडली. शुभमन गिल २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने  १६८ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि भारताचा विजय निश्चित केला. रोहितने कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक झळकवले. त्याने १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा काढल्या. यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर विराट कोहलीने ८१ चेंडूचा सामना करत नाबाद ७४ धावा केल्या. या खेळीत कोहलीने ७ चौकार लागवले.

हेही वाचा : IND VS AUS: सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा

Web Title: Ind vs aus 3rd odi rohit sharma sets new record against australia marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?
1

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण
2

अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण

‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video
3

‘पद्मश्री’ रोहित शर्मा! राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित होतानाचा ‘तो’ अभिमानास्पद क्षण, पहा Video

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
4

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.