रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma’s brilliant century against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधले आपले ३३ वे शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघडी घेऊन मालिका जिंकली आहे. त्यामुळे भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताने शानदार सुरुवात केली असून रोहितने शतक आणि विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारत विजयाच्या जवळ आहे.
हेही वाचा : IND vs AUS : तिसऱ्या ODI दरम्यान भारताला झटका! चालू सामन्यात वेदनेने विव्हळला ‘हा’ खेळाडू; सोडवं लागलं मैदान
सामान्याआधी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मॅथ्यू रेनशॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा केल्याया आणि भारताला विजयासाठी २३७ धावांचे लक्ष्य समोर ठेवले. भारताकडूनकडून हर्षित राणाने ८.४ षटकांत ३९ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताची सुरवात शानदार झाली. यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने भारताला पहिल्या विकेट्ससाठी ६९ धावांची भागीदारी रचून दिली. शुभमन गिल २४ धावा करून माघारी गेला आणि भारताला पहिला झटका बसला. त्यानंतर विराट कोहली मैदान्त आला. पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेला विराट कोहली या सामन्यात शानदार खेळताना दिसत आहे. त्याने आपले अर्धशतक झळकवले आहे आणि रोहित शर्मासोबत शतकाच्या वर मोठी भागीदारी करत आहे. रोहितने ३७ ओव्हरपर्यंत ११९ चेंडूत १०९ धावा करून तो खेळत आहे. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले आहे. तर विराट कोहली ७८ चेंडूत ६८ धावा करून खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग ११ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, मिच ओवेन, नॅथन एलिस, मिशेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेडलवुड
भारताचा प्लेइंग ११ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज






