IND vs AUS : सिडनी कसोटीपूर्वी भारतीय संघांच्या खेळाडूंनी घेतली ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांची भेट
Sydney Test : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस भेटला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ सिडनीत आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी, सिडनी कसोटीपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. आता पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्वतः त्यांच्या X हँडलवरून फोटो शेअर केले आहेत.
भारतीय खेळाडूंनी घेतली ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांची भेट
The Australian and Indian teams have already given us an incredible summer of cricket. pic.twitter.com/oqVDOOr5Bm
— Anthony Albanese (@AlboMP) January 1, 2025
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट
भारतीय संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचीही भेट घेतली. यावेळी कर्णधार पॅट कमिन्ससह जवळपास सर्व कांगारू खेळाडू दिसले. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंसोबत छायाचित्रे काढली. यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
या मालिकेत आतापर्यंत काय घडलं?
मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला १८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ ने पुढे आहे. मात्र, भारतीय संघाने या मालिकेला धमाकेदार सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पलटवार केला. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, मात्र चौथ्या कसोटीत भारतीय संघ पुन्हा १८४ धावांनी पराभूत झाला.