दिनेश कार्तिक(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG: अलिकडेच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी खेळवण्यात आली. ही मालिका खूप चर्चेत राहिली आहे. भारतीय संघाने युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत खेळाडूंसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील चांगलाच चर्चेत आला होता.
इंग्लंड मालिकेत गंभीर चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने आखलेली रणनीती, प्रशिक्षण किंवा संघ निवड नव्हती, तर तो त्याच्या प्रतिमेमुळे प्रसिद्ध झाला होता. यामुळेच इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याच्याकडे खूप लक्ष दिले होते. आता माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आणि समालोचक दिनेश कार्तिक याने देखील यावर भाष्य केले आहे. इंग्लंड मालिकेत गंभीरच्या चेहऱ्यावर हसू दिसून न आल्याने त्याने तक्रार केली आहे.
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हसू दिलसे नाही. याबद्दल चाहत्यांनी तक्रार केल्याचे माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने सांगितले आहे. द हंड्रेड स्पर्धेदरम्यान त्याने हे विधान केले आहे. या दरम्यान कार्तिक अँडी फ्लॉवरशी बोलत होता. अँडी फ्लॉवर ट्रेंट रॉकेट्सचे प्रशिक्षक आहेत. सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने मँचेस्टर ओरिजिनल्सचा सात विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यानंतर कार्तिक म्हणाला की, ब्रिटनच्या चाहत्यांकडून स्काय स्पोर्ट्सला पत्र लिहून तीन लोकांबद्दल तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये गौतम गंभीर, नासिर हुसेन, अँडी फ्लॉवर यांचा समावेश आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान हे तिघेही हसताना दिसले नव्हते.
हेही वाचा : The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही प्रशिक्षकाच्या भूमिकेत डगआउटमध्ये बसलेले असतात तेव्हा लोकांना तुमच्या चेहऱ्यावर हास्य का दिसत नाही?” कार्तिकच्या या विधानाला उत्तर देताना अँडी फ्लॉवर हसत उत्तर दिले. ते म्हणाले की “लोक पूर्णपणे गैरसमज करतात आणि तुम्हाला हे चांगलेच माहित आहे.” नंतर कार्तिकने अँडीच्या विधानाला उत्तर देताना म्हटले आहे की, “मला नक्कीच माहित आहे.” आता दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवर यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.