मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती अचानक बिघडली
मुंबई : उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांना शुक्रवारी सकाळी एअरलिफ्ट करून मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप काही अपडेट देण्यात आलेली नाही. मात्र, वयोमानानुसार त्यांची तब्बेत बिडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोकिलाबेन अंबानी या रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. सध्या त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अंबानी कुटुंबातील सदस्य दक्षिण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता आणखी वाढली आहे. आतापर्यंत अंबानी कुटुंबाकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. परंतु असे सांगितले जात आहे की त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
दरम्यान, २४ फेब्रुवारी १९३४ रोजी गुजरातमधील जामनगर येथे जन्मलेल्या कोकिलाबेन अंबानी यांना अंबानी कुटुंबाची मातृसत्ताक मानली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. अंबानी कुटुंबाला एकसंध ठेवण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
कठीण काळातही घेतली कुटुंबाची काळजी
2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांचे दोन्ही पुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी वेगळे झाले. धीरूभाई अंबानी यांनी त्यावेळी मृत्युपत्र केले नव्हते. त्यानंतर या दोन्ही भावांमधील नाते बिघडले. मात्र, एकेकाळी ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्या काळातही कोकिलाबेन यांनी परिस्थिती सांभाळली आणि तोडगा काढला आणि व्यवसायाची विभागणी केली. नंतर, दोन्ही भावांमधील नाते पुन्हा रुळावर येऊ लागले. यावरून त्यांचे कुटुंबातील असलेले स्थान अधोरेखित करून देते.